शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

प्रवेशासाठी नऊ प्रकारचे पासेस; मंत्र्यांना निवेदन देताना शिष्टमंडळात ५ जणांनाच परवानगी

By सुमित डोळे | Updated: September 16, 2023 12:08 IST

छत्रपती संभाजीनगरातील पाच प्रमुख मार्ग बंद राहणार

छत्रपती संभाजीनगर : मंत्रिमंडळासह सर्व उच्च पदस्थ अधिकारी शनिवारी शहरात आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. मोर्चांना केवळ क्रांती चौक ते भडकल गेट या मार्गावरच परवानगी देण्यात आली आहे. मंत्र्यांना निवेदन देण्यासाठी तेथून पाच जणांच्याच शिष्टमंडळांना परवानगी असेल. पोलिस त्यांच्या वाहनातून त्या पाच जणांना औरंगाबाद क्लबमध्ये नेऊन भेट घडवतील. मंत्र्यांवर शाईफेक व अन्य गैरप्रकार राेखण्यासाठी पोलिसांनी कसून तयारी केली असून कडेकोट तपासणीचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. यात नऊ रंगांचे पासेस ठरवण्यात आले असून त्याशिवाय कोणालाही प्रवेश नसेल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

हे प्रमुख पाच मार्ग बंद- सकाळी सात ते दहा शहानूरमियाँ दर्गा चौक ते सूतगिरणी चौक.- सकाळी सात ते सायंकाळी पाच भडकल गेट ते अण्णा भाऊ साठे चौक.- सकाळी नऊ ते सायंकाळी पाचदरम्यान क्रांती चौक, अजबनगर, बंडू वैद्य चौक, सावरकर चौक, निराला बाजार, नागेश्वरवाडी, खडकेश्वर टी पॉइंट, सांस्कृतिक मंडळ, ज्युबिली पार्क, भडकल गेटपर्यंत.- सायंकाळी चार ते रात्री आठपर्यंत वोक्हार्ट टी ते लहुजी साळवे चौकमार्गे जय भवानी चौकापर्यंत, लहुजी साळवे चौक ते कलाग्राममार्गे (ब्लू वेल सोसायटी चौक) व कलाग्राम ते आयुष पेपर मिलपर्यंत.- क्रांती चौकात शनिवारी सकाळी नऊ ते मध्यरात्री एक वाजेपर्यंत गोपाल टी ते सिल्लेखाना व क्रांती चौक उड्डाणपुलाची पूर्व बाजू आणि क्रांती चौक उड्डाणपुलाच्या पश्चिम बाजूचा सर्व्हिस रस्ता पूर्णपणे बंद राहणार आहे.

पार्किंग व्यवस्था- मंत्रिमंडळ बैठकीसाठी येणारे मोर्चेकरी व निवेदनकर्त्यांच्या वाहनांची कर्णपुरा मैदानावर पार्किंग व्यवस्था असेल.- चिकलठाणा एमआयडीसीतील कलाग्रामसमोरील रिद्धी सिद्धी लॉन्सवरील कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी- गरवारे मैदानाजवळील पार्किंग

असा असेल बंदोबस्तसहा पोलिस अधीक्षक, २३ सहायक आयुक्त, उपअधीक्षक, ११५ पोलिस निरीक्षक, २९६ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, १,७०० पुरुष अंमलदार, १४७ महिला अंमलदार, चार एसआरपीएफ कंपन्या, ५०० होमगार्ड.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार