शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सिल्लोड येथे आगीत नऊ दुकाने जळून खाक; २५ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 18:17 IST

मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान भोकरदन रोडवरील गुजरात ट्रेडिंग कंपनी या दुकानात शॉर्टसर्किट होऊन आग लागली.

सिल्लोड : शहरातील भोकरदन रोडवर शॉर्टसर्किटमुळे नऊ दुकानांना आग लागून दुकाने जळून खाक झाली. मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. यात अंदाजे 25 लाख रुपयांचा नुकसान झाल्याची माहिती दुकानदारांनी दिली.

मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान भोकरदन रोडवरील गुजरात ट्रेडिंग कंपनी या दुकानात शॉर्टसर्किट होऊन आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केल्याने बाजूच्या नऊ दुकांनात आग पसरली. नागरिकांनी नगर परिषदला आगीची माहिती दिली. यानंतर नगर परिषदेचे तीन व खाजगी तीन टँकर घटनास्थळी दाखल झाले. तब्बल दिड तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आली.

या आगीत शेख रजाक शेख सुभान यांचे स्टार वेल्डिंग वर्क शॉप यांचे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. तर शेख उमर यांच्या जनता बकरा मटण शॉप यांचे 10 हजार, शेख कैसर शेख रउफ यांचे भारत फर्निचर 30 हजार,वाजेदखा आलमखा पठाण यांचे रॉयल स्टील फर्निचर 30 हजार,शेख अफसर शेख भिकण यांचे जनता फर्निचर 2 लाख,शेख मननाणं शेख युसूफ यांचे सितारा गैस वेल्डिंग 3 लाख,शेख सोहेल यांचे महाराष्ट्र ऑटो कन्सल्ट, अश्रफ युसुफ कच्ची यांचे गुजरात ट्रेडिंग कंपनी 10 लाख,शेख सादेख यांचे सादेख ऑटो पार्ट्स एन्ड गैरेंज 8 लाख असे नुकसान झाल्याची माहिती दुकान मालकांनी दिली.

आग विझविण्यासाठी नागरिकांचे परिश्रमआग विझविण्यासाठी नगरसेवक रईस मुजावर, शेख फेरोज अकबर, कॉ. सैय्यद अनिस, शेख मुख्तार बबलू, शेख अनिस, शेख याकूब, अस्लम कुरेशी, हाजी कय्युम पठाण, मनोज कोठाले, फहिम पठाण, शेख वहाब, वसीम पठाण, शेख मोईन, शेख युसुफ, फर्मान चौधरी, लुकमान चौधरी, अरुण आरके पांगा, पठाण इम्रान, शेख जावेद, कॉ. जाबेर पठाण, नगर परिषद कर्मचारी अजगर पठाण, अनवर पठाण, शेख अजीम, शेख सलमान, सुधाकर पाथरीकर, जफर पठाण यांनी परिश्रम घेतले.

बघ्यांची मोठी गर्दीदुकांनाना आग लागल्याची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू असल्याने पोलिसांना गर्दी पांगविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

टॅग्स :fireआगAurangabadऔरंगाबाद