शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

९५ टक्के प्रवाशांचा आग्रह; ‘जनशताब्दी एक्सप्रेस’च्या आधी पहाटे मुंबईसाठी हवी नवी रेल्वेगाडी

By संतोष हिरेमठ | Updated: November 5, 2023 11:10 IST

प्रवाशांना मिळत नाही आरक्षण, सध्या सुरू असलेल्या रेल्वेची संख्या अपुरी

- संतोष हिरेमठ/सुमेध उघडेछत्रपती संभाजीनगर: मुंबईसाठी छत्रपती संभाजीनगरहून पूर्वीप्रमाणे पहाटे ६ वाजता रेल्वे पाहिजे. जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ बदलण्याच्या मागणीकडे रेल्वे प्रशासन वर्षभरापासून दुर्लक्ष करीत आहे. या रेल्वेची वेळ बदलता येत नसेल तर ‘जनशताब्दी एक्सप्रेस’आधी छत्रपती संभाजीनगरहून पहाटे मुंबईसाठी नवीन रेल्वे सुरु केली पाहिजे, असे आग्रही मत ९५ टक्के प्रवाशांनी ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात मांडले आहे.

मुंबईसाठी सध्या राज्यराणी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस धावतात. जनशताब्दी एक्स्प्रेस पूर्वी कोरोनापूर्वी पहाटे ६ वाजता छत्रपती संभाजीनगरहून सुटत असे आणि मुंबईत दुपारी एक वाजेपर्यंत पोहोचत असे. त्यामुळे मुंबईतील कामे आटोपून नंदीग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेसने त्याच दिवशी परतीचा प्रवास प्रवाशांना करता येत असे; परंतु, ही रेल्वे आता छत्रपती संभाजीनगरहून सकाळी ९.२० वाजता सुटते आणि दुपारी ४.२० वाजता मुंबईत पोहोचते. त्यातून जनशताब्दी एक्स्प्रेसने मुंबईत गेल्यानंतर मुक्काम केल्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे जनशताब्दी एक्स्प्रेसच्या आधी शहरातून मुंबईसाठी नवीन रेल्वेची आवश्यकता आहे का, यासंदर्भात सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रवाशांचे मत जाणून घेण्यात आले.

सर्वेक्षणात विचारलेले प्रश्न: छत्रपती संभाजीनगरहून मुंबईकडे जाण्यासाठी सध्याच्या रेल्वे पुरेशा आहेत का?- हाेय-० टक्के- नाही-९५.७ टक्के- सांगता येत नाही-४.३ टक्के

छत्रपती संभाजीनगरहून जनशताब्दी एक्स्प्रेसच्या आधी सकाळच्या वेळेत नवीन रेल्वे सुरु व्हावी का?- हाेय-९५.७ टक्के- नाही-० टक्के- सांगता येत नाही-४.३ टक्के

सर्वेक्षणात कोणत्या वयोगटातील प्रवाशांचा सहभाग?- १८ ते ३५ वर्षे- १३ टक्के- ३६ ते ६० वर्षे - ७८.३ टक्के- ६१ ते ७५ वर्षे- ८.७ टक्के

सर्वेक्षणात प्रवाशांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया: - रेल्वे तर आणखी सुरू व्हावी, पण जनरल डब्बेदेखील वाढवावेत.- सकाळी मुंबईसाठी नवीन रेल्वे हवीच- वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करावी.- मुंबईसाठी सकाळी ६ वाजता नव्या रेल्वेची गरज.- मुंबईसाठी आणखी किमान २ रेल्वे तरी पाहिजे. एक सकाळी आणि एक संध्याकाळी.- नांदेड ते मुंबई अजून ४ रेल्वे पाहिजेत.- दिवसातून दोन रेल्वे असाव्यात. एक सकाळी ६ वाजता आणि दुसरी दुपारी १२ वाजता छत्रपती संभाजीनगरहून निघावी. परतीची वेळ दुपारी ३ आणि रात्री ९ वाजेची असावी.- जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ बदला.- मुळात मराठवाड्यातून मुंबई किंवा नाशिकला जाण्यासाठी कमी रेल्वे आहेत. रेल्वेचे आरक्षण भेटणे अवघड झाले आहे. अगदी आरक्षण असले तरी त्या बोगीत बसायला अवघड होते इतकी गर्दी असते.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन