शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद मनपाची करवसुली समाधानकारक नसल्याने विकासकामांना ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 16:20 IST

मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुली समाधानकारक नसल्यामुळे मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी नवीन विकासकामांना तूर्त ब्रेक लावला आहे.

औरंगाबाद : मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुली समाधानकारक नसल्यामुळे मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी नवीन विकासकामांना तूर्त ब्रेक लावला आहे. आयुक्तांच्या आदेशानंतरही शनिवारी तब्बल २३ विकासकामे महा ई-टेंडरला लावण्यात आली. सध्या निविदा प्रसिद्धीला दिलेल्या विकासकामांची संख्या २२३ आहे. सुमारे ४० ते ५० कोटी रुपयांची ही कामे आहेत. विकासकामांचा हा प्रवाह लक्षात घेतल्यास मार्च महिन्यात लेखा विभागावर किमान १०० कोटींचे दायित्व येऊन ठेपणार आहे, हे निश्चित.

खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ लक्षात न घेता मागील वर्षी अर्थसंकल्प तयार करण्यात आला. कोट्यवधी रुपयांची विकासकामे अर्थसंकल्पात घुसडण्यात आली. अर्थसंकल्पात कामांचा समावेश असल्याचे कारण दाखवून नगरसेवकांनी संबंधित कनिष्ठ अभियंत्यांकडून अंदाजपत्रक तयार करून घेतले. मागील आठ ते नऊ महिन्यांमध्ये सहा हजारांपेक्षा जास्त विकासकामांच्या अंदाजपत्रकांना मंजुरी देण्यात आली. त्यातील पन्नास टक्के कामे झाली. सध्या मार्च डोळ्यासमोर ठेवून नगरसेवकांनी तीन हजारांपेक्षा अधिक अंदाजपत्रक मंजूर करून घेतले.

या कामांच्या निविदा प्रसिद्ध झालेल्या नाहीत. मागील आठवड्यात मनपा आयुक्त मुगळीकर यांनी विकासकामांचा आढावा, लेखा विभागाची आर्थिक स्थिती तपासून बघितली. त्यामध्ये उत्पन्नापेक्षा दुप्पट कामे होत असल्याचे निदर्शनास आले. सिमेंट रस्ते, ड्रेनेज लाईन, जलवाहिन्या टाकण्याची जणू काही मोहीमच उघडण्यात आली होती. आयुक्तांनी या सर्व कामांना ब्रेक लावण्याचे आदेश दिले. विद्युत विभागासह आणखी काही विभागांचे अधिकारी राजकीय दबावाला बळी पडून विकासकामांना वाट मोकळी करून देत आहेत. अनेक कामांची आवश्यकता नसतानाही अधिकार्‍यांकडून कामांची शिफारस करण्यात येत आहे. 

४० कोटींचा सध्या अधिभार मागील दोन ते तीन महिन्यांमध्ये शहरात करण्यात आलेल्या विकासकामांची बिले लेखा विभागात दाखल झाली आहेत. सध्या ४० कोटींची बिले अदा करण्याचे दायित्व लेखा विभागावर येऊन ठेपले आहे. त्यात आणखी भर पडणार आहे. मार्चअखेरपर्यंत ६० ते ७० कोटींची बिले येण्याची शक्यता आहे. शहरातील विविध वॉर्डांमध्ये युद्धपातळीवर कामे करण्यात येत आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद