शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

नवीन करप्रणालीचे त्रांगडे

By admin | Updated: May 11, 2016 00:51 IST

वाळूज महानगर : राज्यभरात शासनाने ग्रामपंचायतींना भांडवली मूल्यावर कर आकारणी करण्याचे आदेश दिल्यामुळे ग्रामपंचायतींच्या अडचणीत भर पडली असून

वाळूज महानगर : राज्यभरात शासनाने ग्रामपंचायतींना भांडवली मूल्यावर कर आकारणी करण्याचे आदेश दिल्यामुळे ग्रामपंचायतींच्या अडचणीत भर पडली असून, नवीन पद्धतीनुसार कर आकारणी करण्यासाठी नव्याने मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कारखानदार व मालमत्ताधारकांना विलंबाने कर आकारणी बिलाचे वाटप सुरू असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या कर वसुलीला ब्रेक मिळाला आहे. पूर्वी ग्रामपंचायती कारखानदार व मालमत्ताधारकांकडून क्षेत्रफळानुसार कर आकारणी करीत होत्या. यामुळे शहरालगत असलेल्या गावात व ग्रामीण परिसरातील गावातही एकसमान पद्धतीने वसुली होत होती. मात्र, शहरालगत असलेल्या गावातील व ग्रामीण परिसरातील जागा व मालमत्तेच्या दरात मोठ्या प्रमाणात तफावत असल्यामुळे जुनी पद्धत सदोष असल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.या पद्धतीचा फेरविचार करून सुधारित कर आकारणी करण्याचे आदेश न्यायालयाने शासनाला दिले होते. शासनाने ३१ डिसेंबर २०१५ रोजी नवीन अधिसूचना जारी करून ग्रामपंचायतींना सुधारित प्रणालीनुसार कर आकारणी करण्याचे आदेश दिले. यानुसार आता इमारतीचे व खुल्या जागेचे भांडवली मूल्य निश्चित करण्यात येते. भांडवली मूल्य निश्चित करताना क्षेत्रफळ, जमिनीचे वार्षिक मूल्यदर, बांधकामाच्या प्रकारानुसार कर वसुली, इमारतीचा घसारा व वापरानुसार भारांक या बाबी विचारात घेतात. प्रथम सहा महिन्यांत संपूर्ण कराचा भरणा करणाऱ्या खातेदारास ५ टक्के सवलत दिली जाणार असून वर्ष संपेपर्यंत ग्रामपंचायत कराचा भरणा न केल्यास ५ टक्के दंड आकारला जाईल. पूर्वी ग्रामसभेत ठराव संमत करून ग्रामपंचायतीचे पदाधिकारी कारखानदार मालमत्ताधारकांकडून मनमानी पद्धतीने कर वसुली करीत असल्याचा आरोप होत होता. या प्रणालीत चुकीच्या पद्धतीने कर आकारणी करण्यावर निर्बंध आलेले आहेत.