शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नव्या नियमानं अडचण, एमपीएससीच्या पीएसआय गुणवत्ता यादीला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 05:31 IST

आयोगाने दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र देण्याचे ‘मॅट’चे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट (ब) पोलीस उपनिरीक्षक पदाच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीस ‘मॅट’मध्ये आव्हान दिले आहे. आयोगाने दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र दाखल करावे, असा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे (मॅट) न्यायिक सदस्य न्या.  पी. आर. बोरा व प्रशासकीय सदस्य  बिजयकुमार  यांनी २३ मार्चला दिला आहे. पुढील सुनावणी ६ एप्रिलला ठेवण्यात आली आहे.उपनिरीक्षक पदाकरिता पूर्व परीक्षा आणि ४ ऑगस्ट २०१९ रोजी मुख्य परीक्षा घेतली. परीक्षेचा निकाल २ मार्च २०२१ रोजी जाहीर केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोग नियमावली २०१४  मधील नियम क्र. १०(७) नुसार निकाल प्रक्रियेत समान गुण असलेल्या उमेदवारांची प्राधान्य क्रमवारी ठरवताना ज्या उमेदवाराची शैक्षणिक अर्हता जास्त असेल, त्या उमेदवाराला प्राधान्यक्रम देण्यात येतो.

काय आहे प्रकरण?nआयोगाने उमेदवारांची प्राधान्य क्रमवारी ठरवणाऱ्या नियमांमध्ये बदल करून समान गुण असणाऱ्या ज्या उमेदवाराला मुख्य परीक्षेमध्ये जास्त गुण मिळाले, अशा उमेदवारास प्राधान्य देण्याचा नियम लागू केला. nआयोगाने ८ मार्च २०२२ रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली. nत्यात ज्या उमेदवाराला मुख्य परीक्षेमध्ये जास्त गुण आहेत, अशा उमेदवारांचे नाव प्रथम नमूद करण्यात आले. nकेदार गरड व श्रीधर डोंगरे हे शैक्षणिक अर्हता, तसेच ज्येष्ठ उमेदवार असूनसुद्धा त्यांचा प्राधान्यक्रम खाली आल्यामुळे त्यांनी ॲड. अमोल चाळक पाटील यांच्यामार्फत ‘मॅट’च्या औरंगाबाद खंडपीठात मूळ अर्ज दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाMumbaiमुंबईPoliceपोलिस