शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

नव्या औषधींमुळे मूत्रपिंडरोपण यशस्वी होण्याचे प्रमाण वाढले

By admin | Updated: September 24, 2016 00:30 IST

औरंगाबाद : कमी खर्चात, अधिक परिणामकारक व सुरक्षितपणे करता येईल, यावर तज्ज्ञांनी चर्चा केली.

औरंगाबाद : किडनीतील खड्यांवर लिथोट्रिप्सी, यूआरएस, लेझर अशा विविध प्रकारे उपचार करता येतात. यापैकी कोणत्याही प्रकारचा उपचार कमीत कमी खर्चात, अधिक परिणामकारक व सुरक्षितपणे करता येईल, यावर तज्ज्ञांनी चर्चा केली. नवीन प्रकारच्या औषधींमुळे मूत्रपिंडरोपण शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचे प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.औरंगाबाद युरॉलॉजी असोसिएशनच्या वतीने आयोजित मूत्ररोग शल्यचिकित्सकांच्या पश्चिम विभागीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी विविध विषयांवर चर्चासत्र पार पडले. विविध उपचार पद्धतींवर आयोजित चर्चासत्रात पुणे येथील डॉ. जयदीप दाते, जामनगर येथील डॉ. उल्हास साठे, सोलापूर येथील डॉ. विजय राघोजी, मुंबई येथील डॉ. लालमलानी, अहमदाबाद येथील डॉ. कंदर पारीख यांनी मार्गदर्शन केले. १५ ते २० टक्के लोकांना मूतखड्याच्या त्रासाला सामोरे जावे लागते. परंतु अत्याधुनिक दुर्बिण आणि लेझर तंत्रज्ञानामुळे मूतखडा काढणे सोपे झाले आहे. दुर्बिणींचा आकार कमी झाल्यामुळे त्याचा मोठा फायदा होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. मूत्रपिंडरोपणावरील चर्चासत्रात डॉ. राजापूरकर नडियाद, डॉ. ओझा, डॉ. ओसवा, डॉ. गणपुले यांचा सहभाग होता. किडनी, मूत्राशय, प्रोस्टेड ग्रंथींच्या कर्करोगावर डॉ. मकरंद कोचीकर यांनी मार्गदर्शन केले. परिषदेत विविध विषयांवर शोधनिबंधही सादर करण्यात आले. त्यातून नवीन संशोधनाचे आदान-प्रदान करण्यात आले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ.पुरुषोत्तम दरख, डॉ.अभय महाजन, डॉ. देवदत्त पळणीटकर, डॉ. विजय दहीफळे व औरंगाबाद युरॉलॉजी असोसिएशनचे सदस्य प्रयत्न करीत आहेत.