शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज चुकविण्यासाठी शक्कल; स्पेअर पार्ट, चेसीस क्रमांक बदलून कार ठेवल्या विक्रीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 19:12 IST

crime in aurangabad : कारवर कर्जाची मोठी रक्कम शिल्लक असताना आरोपींनी कर्ज चुकविण्यासाठी नव्या कारचे स्पेअर पार्ट काढून मुंबई येथून विकत आणलेल्या जुन्या कारला बसविले.

ठळक मुद्दे आरोपींनी खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन दोन कार खरेदी केल्या होत्या.

औरंगाबाद : फायनान्स कंपनीचे कर्ज असलेल्या नवीन कारचे स्पेअरपार्ट काढून जुन्या कारला आणि जुन्या कारचे स्पेअर पार्ट नवीन कारला बसवत कारची विक्री करणाऱ्या दोन वाहनचालकांना गुन्हे शाखेने सोमवारी पकडले. आरोपींकडून १८ लाख ५० हजार ५०० रुपये किमतीच्या चार कार जप्त केल्या. शेख सद्दाम शेख जहीर (२८, रा. अन्सार कॉलनी, पडेगाव) आणि शेख शोएब शेख जुबेर (३१, रा. प्रिया कॉलनी, पडेगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ( Four cars with color and chassis number changed seized, two arrested) 

प्राप्त माहितीनुसार आरोपी हे गेल्या काही दिवसांपासून जुन्या कार खरेदी- विक्रीचा व्यवसाय करीत होते. आरोपींनी खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन दोन कार खरेदी केल्या होत्या. या कारवर कर्जाची मोठी रक्कम शिल्लक असताना आरोपींनी कर्ज चुकविण्यासाठी नव्या कारचे स्पेअर पार्ट काढून मुंबई येथून विकत आणलेल्या जुन्या कारला बसविले. जुन्या कारचे स्पेअर पार्ट त्या नवीन कारला बसविले. शिवाय ,जुन्या कारचे चेसिस क्रमांक आणि रंगात त्यांनी फेरबदल करून कार विक्रीसाठी उपलब्ध केल्या. ही बाब गुन्हे शाखेला मिळताच सहायक पोलीस आयुक्त रवींद्र साळोखे, निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आर. एम. जोंधळे, सहायक फौजदार नजीर पठाण, शेख नजीर, हवालदार सुधाकर मिसाळ, सतीश जाधव, अश्वलिंग होनराव, रवींद्र खरात, सुनील बेलकर आणि पंढरीनाथ जायभाये यांनी पडेगावतील अन्सार कॉलनीतील एका गॅरेजवर छापा मारून संशयित दोन आरोपींना पकडले आणि त्यांच्या ताब्यातून चार कार जप्त केल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद