शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सुभेदारीत 'व्हीआयपी' सूट्सची उभी राहणार नवी इमारत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 13:36 IST

सुभेदारी विश्रामगृह परिसरातील अ‍ॅनेक्स या व्हीआयपी कक्षालगत असलेल्या जागेत ६ कोटी रुपये खर्चातून ‘व्हीव्हीआयपी’ सूटस् असलेली नवीन इमारत बांधण्यात येणार आहे.

- विकास राऊत 

औरंगाबाद : सुभेदारी विश्रामगृह परिसरातील अ‍ॅनेक्स या व्हीआयपी कक्षालगत असलेल्या जागेत ६ कोटी रुपये खर्चातून ‘व्हीव्हीआयपी’ सूटस् असलेली नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. पर्यावरण मैत्रभाव (इको फ्रेंडली) ग्रीनफिल्डच्या धर्तीवर ती इमारत बांधण्यात येणार असून, पुण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या इमारतीप्रमाणेच येथील इमारत बांधण्यात येणार आहे. बांधकाम विभागाने यासाठी आराखडा तयार केला असून, जिल्हा नियोजन समितीतून या कामासाठी निधी देण्यात येणार आहे. 

या दशकामध्ये शहरात पर्यटक येण्याचे प्रमाण वाढते आहे, तसेच प्रादेशिक पातळीवर शासकीय बैठका होत आहेत. आगामी काळात सर्व शासकीय कार्यालयांचे संकुल लेबर कॉलनी परिसरात बांधण्याचे विभागीय प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियोजन आहे. सुभेदारी विश्रामगृहात सध्या असलेली व्यवस्था पुरेशी नाही. सर्व मिळून ४५ सूटस् तेथे आहेत. त्यामुळे चांगल्या सोयीची एक इमारत बांधण्याचा प्रस्ताव गेल्यावर्षी चर्चेला आला. विद्यमान परिसरात सभागृह नाही, त्यामुळे नवीन इमारती सुसज्ज असे सभागृह, पार्किंगची व्यवस्था असणार आहे. 

अधीक्षक अभियंता म्हणालेबेडरुम्स, किचन, हॉल, गॅलरी अशी किमान टू बीएचकेचा एक सूटस् असणार आहे. कॅबिनेट मंत्री आणि सचिव दर्जाचे अधिकारी व सर्वाेच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना व  आंतरराष्ट्रीय स्तरावरील ठराविक पर्यटकांना येथे थांबता येईल. इतरांसाठी ते सूटस् उपलब्ध होणार नाहीत. या इमारतीमध्ये मंत्री तथा सचिवांना बैठका घेण्यासाठी मोठा प्रशस्त हॉल (सभागृह) बांधण्यात येणार असून तो हॉल सुविधायुक्त असेल. सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहावी. विजेचा वापर कमी प्रमाणात होईल. तसेच सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणेदेखील या इमारतीत वापरण्याचा विचार सुरू असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी सांगितले. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद