शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बच्चे कंपनीसाठी नवे आकर्षण, सिद्धार्थ उद्यानात लवकरच ‘वॉटर बोट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 19:38 IST

मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ उद्यानात तुळजाई एंटरप्रायजेसमार्फत उभारण्यात येणारा वॉटर बोट हा प्रकल्प १५ मेपर्यंत कार्यान्वित होईल

औरंगाबाद : महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात लहान मुले मोठ्या संख्येने येतात. मुलांच्या करमणुकीसाठी वेगवेगळे उपक्रम मनपा प्रशासनाकडून राबविण्यात येत आहेत. उद्यानात एका ठिकाणी मुव्हेबल रबर वॉटर टँकच्या साहाय्याने वॉटर बोट व इतर खेळणी उभारण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी तुळजाई एंटरप्रायजेस संस्थेने तयारी दर्शवली असून, दहा वर्षांसाठी हा प्रकल्प राबविला जणार असल्याचा ठराव घेण्यात आला आहे.

महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने तुळजाई एंटरप्रायजेस यांना ५ ते १२ वयोगटातील मुलांच्या मनोरंजनासाठी मुव्हेबल रबर वॉटर टँकमधील वॉटर बोट व इतर खेळणी उभारणे, परिसराचे सुशोभीकरण करणे, हा परिसर कायम स्वच्छ ठेवून दहा वर्षे प्रकल्प चालविण्यासाठी १ लाख रुपयांची सुरक्षा अनामत रक्कम भरून घेतली जाणार आहे. या प्रकल्पासाठी २० बाय ३० आकाराची जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर ५० रुपये प्रति बालक अशी फी आकारण्यात येईल. या माध्यमातून जमा होणाऱ्या रकमेचा हिशोब दरमहा सादर करावा लागेल. दर महिन्याच्या उत्पन्नातून २५ टक्के रक्कम रॉयल्टी म्हणून मनपाला द्यावी लागेल. दरवर्षी प्रवेश फी व रॉयल्टीमध्ये दहा टक्के भाववाढ केली जाईल, अशा अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहेत.

२५ टक्के सूटवॉटर बोटसाठी प्रति बालकास ५० रुपये फी आकारण्यात येणार असली तरी शालेय सहल आणि शालेय विद्यार्थ्यांच्या ग्रुपला २५ टक्के सवलत दिली जाणार आहे. प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना आवाजामुळे त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल.

१५ मे पासून कार्यान्वित होणारमनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ उद्यानात तुळजाई एंटरप्रायजेसमार्फत उभारण्यात येणारा वॉटर बोट हा प्रकल्प १५ मेपर्यंत कार्यान्वित होईल, या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. उद्यानात येणाऱ्या बालकांना खेळण्यासाठी मनोरंजनाचे साधन उपलब्ध होणार असल्याचे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका