लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईसाठी लवकरच नव्या विमानसेवेची भर पडणार आहे. उडान या योजनेंतर्गत औरंगाबाद-मुंबई ही विमानसेवा सुरू करण्यासाठी डेक्कन चार्टर्स या विमान कंपनीने पुढाकार घेतला आहे. चिकलठाणा विमानतळावरून आजघडीला एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रूजेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे. या तीन विमान कंपन्यांच्या सेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई सेवेने जोडले आहे. चिकलठाणा विमानतळावरून नवीन विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून प्रयत्न सुरू आहे. यासाठी विविध कंपन्यांना प्रस्ताव देण्यात आले आहे, अशा परिस्थितीत मुंबईसाठी विमानसेवा सुरू क रण्यासाठी द डेक्कन चार्टर्सने तयारी दर्शविली आहे. मुंबईहून रात्री ७.४५ वाजता उड्डाण घेऊन रात्री ८.२५ वाजता औरंगाबादला विमान येईल आणि त्यानंतर रात्री ९ वाजता औरंगाबादहून उड्डाण घेऊन मुंबईला ९.४० वाजता पोहोचेल, अशा दृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. उडान योजनेंतर्गंत ही विमानसेवा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे अल्पदरात विमानसेवा उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.
मुंबईसाठी लवकरच नवीन विमानसेवा
By admin | Updated: June 16, 2017 00:58 IST