शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

बंगळुरू, हैदराबादसाठी नवी विमानसेवा; औरंगाबादच्या हवाई कनेक्टिव्हिटीचे ‘उड्डाण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 12:52 IST

पहिल्याच दिवशी मिळाला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद

ठळक मुद्देऔरंगाबादहून उड्डाण करणाऱ्या विमानांची संख्या ११ वर गेली आहे.विमानसेवा आणखी वाढणार

औरंगाबाद : शहराच्या देशांतर्गत हवाई कनेक्टिव्हिटीचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. स्पाईस जेटची सोमवारपासून बंगळुरू आणि हैदराबादसाठी नवीन विमानसेवा सुरू झाली. पहिल्याच दिवशी या दोन्ही विमानांना प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला.

स्पाईस जेटच्या हैदराबाद-औरंगाबाद विमानाने सोमवारी ६७ प्रवासी शहरात आले आणि औरंगाबादहून ४७ प्रवासी हैदराबादला रवाना झाले. याबरोबरच बंगळुरू साठी सुरू केलेल्या नव्या विमानाने पहिल्या दिवशी ६७ प्रवासी औरंगाबादेत दाखल झाले, तर २७ प्रवाशांनी औरंगाबादहून बंगळुरूचा प्रवास केला. पहिल्याच दिवशी दोन्ही विमानांना प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. या दोन्ही विमानांचे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत करण्यात आले.

११ विमानांची ये-जाऔरंगाबादहून उड्डाण करणाऱ्या विमानांची संख्या ११ वर गेली आहे. म्हणजे ११ विमानांची दररोज ये-जा होत आहे. स्पाईस जेटकडून दिल्लीसाठी २ विमानसेवा, बंगळुरू आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू होती. त्यात सोमवारपासून बंगळुरू आणि हैदराबादसाठी नव्या विमानसेवेची भर पडली. ट्रूजेटकडून ७२ आसनी विमानाद्वारे हैदराबाद आणि अहमदाबादसाठी सेवा सुरू आहे. त्यामुळे शहरातून सध्या दररोज बंगळुरूसाठी २ आणि हैदराबादसाठी ३ विमाने उपलब्ध झाली आहेत.

विमानसेवा आणखी वाढणारऔरंगाबादहून ५ फेब्रुवारीपासून मुंबईसह दिल्ली आणि हैदराबादसाठीही इंडिगोकडून विमानसेवा सुरू करण्यात येत आहे, तसेच २० फेब्रुवारीपासून बंगळुरूसाठीही विमानसेवा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे २० फेब्रुवारीनंतर बंगळुरूसाठी उड्डाण घेणाऱ्या विमानांची संख्या ३ वर जाईल. 

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळAurangabadऔरंगाबादtourismपर्यटनairplaneविमान