शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

पैशांसाठी तगादा लावल्याने चुलत्याची हत्या करणारा पुतण्या अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 17:48 IST

आरोपीला पैठण येथून घेतले ताब्यात

औरंगाबाद : चुलत्याची हत्या केल्यानंतर देवळाई चौकातून पसार झालेल्या आरोपीला पैठणमधील  लॉजमधून अटक करण्यात पुंडलिकनगर पोलिसांना सोमवारी सकाळी यश आले. बचत गटाच्या २५ हजार रुपयांसाठी मृत शेख सत्तार यांनी तगादा लावत शिवीगाळ केल्यामुळे आपण ही हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली. 

शेख आलीम शेख बुढण (२२, रा. बायपास परिसर), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. मृत शेख सत्तार शेख सांडू यांच्यावर देवळाई येथे सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. याविषयी पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, पैशाच्या वादातून अलीमने चुलते सत्तार यांचा धारदार शस्त्राने भोसकून रविवारी सायंकाळी खून केला होता. या खुनानंतर अलीम  सिल्कमिल कॉलनीत गेला. तेथून त्याने त्याच्या साडूला फोन करून बोलावून घेतले आणि त्याच्या पत्नीला जालना येथे नेऊन सोडण्यास सांगितले. यानंतर अलीम चित्तेपिंपळगाव येथे गेला. तेथे त्याने दारू पिली आणि तेथून तो पैठणला गेला.

तेथील एका लॉजवर मुक्कामी थांबल्यानंतर सोमवारी सकाळी त्याने लॉजवरील कर्मचाऱ्याच्या मोबाईलवरून त्याच्या साडूच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्याच्याकडे ७०० रुपयेच शिल्लक आहेत. त्याला पैशाची आवश्यकता असल्याचे म्हणाला. मात्र, तेव्हा पोलिसांनी अलीमच्या साडूला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यामुळे अलीम पैठणमध्ये असल्याचे पोलिसांना समजले. सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि कर्मचाऱ्यांनी पैठण येथील त्या लॉजवर जाऊन अलीमला ताब्यात घेतले. 

फिर्याद देण्यास नकाररविवारी सायंकाळी खून झाल्यापासून ते आज सोमवारी ४ वाजेपर्यंत मृताचे नातेवाईक खुनाची फिर्याद पोलिसांकडे नोंदविण्यास नकार देत होते. मृत आणि आरोपी एकाच कुटुंबातील असल्याने आमचे आम्ही पाहून घेतो, असे नातेवाईक पोलिसांना म्हणत होते. पोलिसांनी मात्र याविषयी तक्रार द्यावीच लागते, असे स्पष्टपणे सांगितले. शेवटी मृताची पत्नी फिर्याद देण्यास तयार झाली.

२५ हजारांसाठी झाली हत्यासत्तार यांच्या बचत गटाकडून अलीमने २५ हजार रुपये कर्ज घेतले होते. ही रक्कम अलीम बचत गटाकडे जमा करीत नव्हता. यामुळे सत्तार यांनी अलीमला फोन करून पैशासाठी शिवीगाळ केली. यामुळे चिडलेल्या अलीमने सत्तार यांना सायंकाळी देवळाई चौकात ये, तुला हिशोब देतो, असे अर्वाच्च भाषेत सांगितले. अलीम देवळाई चौकात चाकू घेऊन हजरच होता. तेथे सत्तार येताच अलीमने चाकूहल्ला करून त्यांचा खून केला.