शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

शेजारधर्म पाळला की खैरेंना डिवचले ? सेना आमदार दानवेंनी भाजपाच्या कराडांना पेढा भरवून दिल्या शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 17:24 IST

शुभेच्छा देऊन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या जखमेवर मीठ चोळत त्यांना डिवचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रविवारी दिवसभर रंगली.

ठळक मुद्देशिवसेना-भाजपतील संघर्षाचा विचार न करता दिल्या शुभेच्छादानवे आणि कराड हे जुने शेजारी आहेत.

औरंगाबाद : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांची राज्यसभेच्या सदस्यपदी निवड निश्चित असल्याचे स्पष्ट होताच, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आ. अंबादास दानवे यांनी रविवारी त्यांना पेढा भरवून शुभेच्छा दिल्या.शिवसेना-भाजपतील राजकीय युद्धाचा विचार न करता त्यांनी शुभेच्छा देऊन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या जखमेवर मीठ चोळत त्यांना डिवचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रविवारी दिवसभर रंगली.

शहरातील राजकीय वातावरण आणि मागील ३० वर्षांत पक्षासाठी दिलेल्या योगदानामुळे खैरेंना राज्यसभेवर संधी मिळण्याची खात्री होती. मात्र, पक्षाने प्रियांका चतुर्वेदी यांना उमेदवारी दिल्याने खैरे यांचा अपेक्षाभंग झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. भाजपने डॉ. कराड यांना संधी देऊन राजकीय डाव साधल्याचे मतही खैरेंनी व्यक्त केले होते. निराश झालेले खैरे दोन दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ होते.  सेनेने राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवत महाविकास आघाडीचे सरकार बनविले. राजकीय खेळी करून भाजपकडून मुख्यमंत्रीपद हिसकावले. त्याचे पडसाद दोन्ही पक्षांत उमटल आहेत. असे असताना आ. दानवे हे कराड यांच्या घरी गेल्याने चर्चेला उधाण आले आहे.  

दानवेंनी शेजारधर्म पाळला दोन्ही पक्षातील राजकीय द्वंद्व जोरदारपणे सुरू असताना आ. दानवे यांनी हे सर्व विसरून शेजारधर्म पाळला. दानवे आणि कराड हे जुने शेजारी आहेत. दोघांच्या निवासस्थानामध्ये क्रांतीचौक ते पैठणगेट हा रस्ता आहे. रस्ता ओलांडून रविवारी दानवे यांनी कराड यांचे पेढा भरवून तोंड गोड केले. दानवेंनी शेजारधर्माच्या नावाखाली खैरेंच्या भावनांना डिवचण्यासाठी तर हा प्रकार केला नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाAmbadas Danweyअंबादास दानवेChandrakant Khaireचंद्रकांत खैरेAurangabadऔरंगाबाद