शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

२०२१ पैकी सुमारे २२५ मतदान केंद्रांवर बोटावर मोजण्याइतके झाले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 18:50 IST

शिवसेनेला १६, एमआयएमला १०, तर अपक्षाला ११ केंद्रांवर शून्य मतदान

ठळक मुद्देशिवसेनेच्या पारंपरिक मतांना खिंडार काँग्रेसला अनेक केंद्रांवर ५० च्या आत-बाहेर मतदान झाले

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीसाठी सहा विधानसभा क्षेत्र मिळून असलेल्या २०२१ मतदान केंद्रांपैकी सुमारे २२५ केंद्रांवर सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना बोटावर मोजण्याइतके मतदान झाले आहे. शिवसेनेला १६ केंद्रांवर शून्य मतदान झाले आहे. एमआयएमला १० केंद्रांवर, तर अपक्ष उमेदवाराला ११ केंद्रांवर शून्य मतदान झाले आहे. काँग्रेसला अनेक केंद्रांवर ५० च्या आत-बाहेर मतदान झाले आहे. 

मुस्लिम आणि दलित भागातून शिवसेनेला १, २, ७, ५ अशी मते मिळाली आहेत. २०२१ पैकी अंदाजे २ हजार बुथवर शिवसेनेला मतदान झाले आहे. एमआयएमला देखील १० ते १५ मतदान केंद्रे सोडली तर जवळपास सर्व केंद्रांवर खाते उघडता आले. अपक्ष उमेदवारालादेखील १० केंद्रे वगळता सर्वत्र कमी-अधिक मते मिळाली आहेत. काँग्रेसला सर्व केंद्रांवर मतदान मिळाले आहे. एक-दोन वगळता कोणत्याही केंद्रावर काँग्रेसला शून्य मते मिळालेली नाहीत. 

गंगापूर मतदारसंघातून १० केंद्रांवर शिवसेनेला बोटावर मोजण्याइतके मतदान झाले. पश्चिम मतदारसंघात ६ ते ७ केंद्रांवर, तर मध्य मतदारसंघात ५ केंद्रांवर शून्य मतदान मिळाले आहे. २१ केंद्रांवर १ ते ७ मतांदरम्यान मते सेना उमेदवाराला मिळाली आहेत. पूर्व मतदारसंघातील ३५ केंद्रांवर सर्व मिळून १०५ मते सेना उमेदवाराला मिळाली आहेत. तशी परिस्थिती अपक्ष उमेदवाराची आहे. हिंदूबहुल भागांमध्ये एमआयएमच्या उमेदवाराला मतदान झाले आहे. वैजापूरमध्ये एमआयएमला १२ केंद्रांवर कमी मतदान झाले आहे.  कन्नड मतदारसंघात एमआयएमला १८ बुथवर कमी मतदान आहे. 

शिवसेनेच्या पारंपरिक मतांना खिंडार २० वर्षांपासून शिवसेनेकडे मतदारसंघ असल्यामुळे सर्व मतदान केंद्रांवरून कमी-अधिक मतदान होणे स्वाभाविक आहे; परंतु एमआयएम आणि अपक्ष उमेदवाराला प्रचाराला आणि स्वत:ला मतदारांसमोर जाण्यास कमी वेळ मिळाला तरी त्यांना जवळपास सर्व केंद्रांवर मतदान झाले. अपक्ष उमेदवाराला अपक्षेपेक्षा जास्त मते मिळाल्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात शिवसेनेच्या पारंपरिक मतांना खिंडार पडल्याचे मतदान केंद्रनिहाय आकडेवारीवरून दिसते. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल