औरंगाबाद : गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलावर रविवारी झालेल्या १० वर्षांखालील राज्यस्तरीय रँकिंग टेनिस स्पर्धेत पुणे येथील नील जोगळेकर याने मुलांच्या, तर आश्मी अदकर हिने मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले.मुलांच्या गटात एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात पुणे येथील नील जोगळेकर याने मुंबईच्या वेदांत भसीन याचा ४-०, ४-० असा पराभव करीत विजेतेपदावर सहज शिक्कामोर्तब केले. मुलींच्या गटातील अंतिम सामनादेखील अगदीच एकतर्फी ठरला. त्यात पुणे येथील आश्मी अदकर हिने कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधव हिच्यावर ४-०, ४-० अशी सहज मात करीत अजिंक्यपद पटकावले. बक्षीस वितरण आशुतोष मिश्रा, गजेंद्र भोसले व टूर्नामेंट सुपरवायझर प्रवीण गायसमुद्रे यांच्या उपस्थितीत झाले.
नील, आश्मी यांनी जिंकली रँकिंग टेनिस स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:33 IST