शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

एकल महिलांसाठी विशेष धोरणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:03 IST

शनिवारी दुपारी मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे ‘एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नैसर्गिक आपत्ती असो किंवा कोणतीही दुर्दैवी सामाजिक घटना असो. या सर्व आपत्तींची सर्वाधिक बळी ठरते ती आपल्या देशातल्या सामाजिक उतरंडीच्या तळाशी असणारी महिला आणि या महिलेपेक्षाही बिकट अवस्था होते ती अगदी तळागाळाशी असणाºया एकल महिलेची. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने एकल महिला (अविवाहित, विधवा, परित्यक्ता यांना एकल महिला म्हणून संबोधतात.) असूनही त्यांची अधिकृत नोंदणी कुठेही झाली नाही. शासनाने एकल महिलांच्या विविध प्रश्नांसंबंधी अभ्यासपूर्ण अहवाल तयार करून त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरण ठरविण्याची गरज असल्याचा सूर परिसंवादात उमटला.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद व विकास अध्ययन केंद्र, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दुपारी मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे ‘एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अ‍ॅक्शन एड, राज्य प्रमुख नीरजा भटनागर, स्त्री अभ्यासक डॉ. वृषाली किन्हाळकर व पत्रकार दीप्ती राऊत यांनी त्यांची मनोगते मांडली आणि या महिलांना सन्मान आणि समानता देण्यासाठी विशेष धोरण ठरवावे, अशी एकमुखाने मागणी केली. याप्रसंगी व्यासपीठावर विकास अध्ययन केंद्राचे संचालक सुरेश शेळके, सुहास तेंडुलकर, सुबोध जाधव, सामाजिक कार्यकर्त्या रेणुका कड आदींची विशेष उपस्थिती होती.रेणुका कड यांनी तयार केलेल्या ‘एकल महिला आणि पाणी प्रश्न’ या अभ्यासपूर्ण अहवालाचे याप्रसंगी मान्य्याप्रसंगी बोलताना भटनागर म्हणाल्या की, अधिकारांचा आणि हक्कांचा प्रश्न जेव्हा येतो, तेव्हा ती महिला एकलच होते. सधन घरच्या एकल महिलांची परिस्थिती गरीब घरच्या एकल महिलांपेक्षा तुलनेने अधिक चांगली आहे. एकल महिला ही देशाची नागरिक असून, तिला नागरिकत्वात असणारे सगळे अधिकार मिळायलाच हवेत, असा विचार त्यांनी मांडला. महिलांच्या प्रश्नांना माध्यमातही जागा मिळत नाही. १९९४ साली औरंगाबादेत झालेल्या परित्यक्ता महिलांच्या परिषदेत मांडण्यात आलेल्या मागण्या आणि आता विशेष धोरणासाठी करण्यात आलेल्या मागण्या यात काहीही फरक नसून ही महिलांची एकप्रकारे चेष्टा केल्यासारखेच आहे, असे मत राऊत यांनी व्यक्त केले.एकल स्त्री, पाणी प्रश्न, दुष्काळ हे एकमेकांचे समानार्थी शब्दच आहेत. एकल महिलांचा सर्व दृष्टीने अभ्यास होत असताना त्यांच्या शारीरिक गरजांबाबत अजून किती शतके मौन बाळगणार, असा सवाल वृषाली किन्हाळकर यांनी केला आणि एकल महिलांच्या शारीरिक गरजांबाबतही समानता हवी, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी पुणतांबा येथे शेतकºयांच्या प्रश्नावर आणि शेतमालाबाबत आंदोलन उभे करणाºया डॉ. धनंजय धनवटे यांचा सत्कार करण्यात आला.