शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पदोन्नती अन् शहरात बदली पाहिजे; मग ३ लाख मोजा; आरोग्य विभागातील धक्कादायक प्रकार

By संतोष हिरेमठ | Updated: June 16, 2025 11:55 IST

जर पैसे दिले नाही तर ग्रामीण भागांत ‘ऑर्डर’ काढण्याची धमकीच देण्याचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक आरोग्य विभागात अधिपरिचारिका या संवर्गातून सेवाज्येष्ठतेनुसार परिसेविका या पदावर पदोन्नती तसेच शहराच्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी ३ लाख रुपये मोजावे लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. टेबलाखालूनची ‘दुकानदारी’ करण्याचा प्रताप आरोग्य विभाग, छत्रपती संभाजीनगर परिमंडळाच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे.

आरोग्य विभाग, छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील अधिपरिचारिका संवर्गातून सेवाज्येष्ठतेनुसार परिसेविका या पदावर पदोन्नतीची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. ही यादी जाहीर झाल्यानंतर आरोग्य उपसंचालक कार्यालयातील टेबलाखालून कारभार करणाऱ्या काहींनी स्वत:चा ‘उद्योग’ सुरू केला. पदोन्नती आणि इच्छितस्थळी बदली, पदस्थापना पाहिजे, असेल तर ३ लाख रुपये मोजा, अशी दुकानदारी सुरू झाली. जर पैसे दिले नाही तर ग्रामीण भागांत ‘ऑर्डर’ काढण्याची धमकीच देण्याचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. यातून काहींनी मनासारख्या नियुक्तीसाठी पैसे मोजल्याचे समजते.

अन्यथा, गंगाखेड येथे टाकू !याप्रकरणी एका अधिपरिचारिकेने धाडस करून उपसंचालकांकडे हा प्रकार मांडला. छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालयासाठी ३ लाख रुपयांची मागणी केली गेली. पैसे देण्याची इच्छा नसताना कार्यालयात बोलावून संबंधिताने ‘गंगाखेड येथे टाकू’ असे सांगितले. घाबरून पैसे द्यावे लागले, असे या अधिपरिचारिकेने नमूद केले.

किती वर्षांपासून हा उद्याेग? किती जणांकडून वसुली?आरोग्य विभागात नियमितपणे पदोन्नती, बदल्या होत असतात. त्यामुळे पदोन्नती आणि बदल्यांसाठी ‘वसुली’ करण्याचा प्रकार किती वर्षांपासून सुरू आहे? आतापर्यंत कोणाकोणाकडून ‘वसुली’ करण्यात आली? आदींचा आता शोध घेणे गरजेचे आहे. शिवाय हा प्रकार खालच्या स्तरावरील कर्मचारीच करतात की, त्यात वरिष्ठही सहभागी आहेत, असा प्रश्न आहे.

चौकशी समिती नेमलीयाप्रकरणी आरोग्य उपसंचालक डाॅ. कांचन वानेरे यांनी चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. चौकशी होईपर्यंत याप्रकरणातील संबंधित कर्मचाऱ्यास करमाड येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

१५ दिवसांत येईल अहवालया प्रकरणी एक तक्रार आलेली आहे. यासंदर्भात चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. ती १५ दिवसांत अहवाल देईन. चौकशी होईपर्यंत संबंधित कर्मचाऱ्याला करमाड येथे प्रतिनियुक्ती दिली आहे.- डाॅ. कांचन वानेरे, आरोग्य उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर परिमंडळ

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी