शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
2
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
3
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
4
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
5
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
6
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
7
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
8
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
9
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
10
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
11
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
12
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
13
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
14
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
15
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
16
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
17
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
18
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
19
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

विद्यापीठाच्या विकासासाठी प्रशासनात सकारात्मक बदलाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 19:56 IST

विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती झाल्यापासून मागील आठ महिन्यांत त्यांनी प्रशासनावर चांगलाच वचक निर्माण केला होता.

- राम शिनगारे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केलेले विविध प्रश्न, समस्यांमध्ये प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची दिरंगाई, कामचुकारपणा प्रकर्षाने समोर आला. व्यवस्थापन परिषद, कुलगुरूंनी निर्णय घेतल्यानंतरही त्याची योग्यपणे अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे विद्यापीठाचा वेगाने विकास करण्यासाठी प्रशासनात सकारात्मक बदल केल्याशिवाय पर्याय नसल्याचेही स्पष्ट झाले.

विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती झाल्यापासून मागील आठ महिन्यांत त्यांनी प्रशासनावर चांगलाच वचक निर्माण केला होता. सुरुवातीलाच एका उपकुलसचिवाची बदली उस्मानाबाद उपकेंद्रात केल्यानंतर अनेक कर्मचारी, अधिकारी वेळेवर कामे करू लागली होती. मात्र मागील दोन-तीन महिन्यांपासून ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होत आहे. प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणे, विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होते की नाही, यावर देखरेख करण्याचे काम हे कुलसचिवांचे असते. व्यवस्थापन परिषद, अधिसभा, विद्यार्थी कल्याण मंडळ आदी अधिकार मंडळांत कुलसचिव वा सचिव असतात. त्यांच्या नियंत्रणात घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाते. मात्र, विद्यमान कुलसचिवांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे अधिसभेच्या बैठकीत दिसून आले. व्यवस्थापन परिषदेत घेतलेल्या निर्णयाची, स्थापन केलेल्या समितीची पत्रेही कुलसचिव कार्यालयाकडून संबंधितांना पोहोचली नसल्याचा आरोप सदस्यांनी केला.

उच्चशिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या तैलचित्र अनावरण कार्यक्रमाच्या पत्रिकाच छापण्यात आल्या नाहीत. यात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असतील, मात्र अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्यांना याची माहिती कळविणे आवश्यक होते. याबाबत दिरंगाई झाल्याचे दिसून आले. याशिवाय इतर काही प्रकरणांत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कुलगुरूंना सदस्यांच्या आक्रमकतेपुढे माघार घ्यावी लागली. तरीही कुलगुरूंनी प्रशासनाला उघडे पडू दिले नाही. प्रशासनाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. असे असले तरीही कुलगुरूंना प्रशासनातील कामचुकारांचा बचाव अधिक दिवस करता येणार नाही. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारावाच लागेल. यासाठी कुलसचिव सक्षम असणे गरजेचे आहे. या पदाच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. प्रशासनाची माहिती आणि अनुभवी व्यक्तीची निवड करण्याचे आव्हान कुलगुरूंपुढे असणार आहे. ही निवड करताना राज्य शासनासह विविध गटांचा दबाव झुगारण्याचीही गरज आहे. त्याशिवाय गुणवत्तेला प्राधान्य देता येणार नाही. यात कुलगुरू किती यशस्वी होतात ते निवडींवरून स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रProfessorप्राध्यापक