शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

सैन्यात महाराष्ट्राचा डंका! छ. संभाजीनगरच्या SPI संस्थेचे २१ विद्यार्थी 'एनडीए'त झळकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 19:44 IST

पहिल्या १०० मध्ये 'मराठमोळे' ६ चेहरे! एनडीए परीक्षेत महाराष्ट्राच्या लेकरांची उत्तुंग झेप.

छत्रपती संभाजीनगर : भारतीय सैन्यदलात अधिकारी घडवणाऱ्या 'नॅशनल डिफेन्स अकॅडमी' आणि 'नेव्हल अकॅडमी' परीक्षेच्या निकालात छत्रपती संभाजीनगरच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेने पुन्हा एकदा आपली यशाची परंपरा अधोरेखित केली आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या एनडीए (द्वितीय) २०२५ च्या अंतिम निकालात या संस्थेतील तब्बल २१ विद्यार्थ्यांनी 'टॉप मेरिट'मध्ये स्थान मिळवले. विशेष म्हणजे, मुलींच्या सैन्य भरतीतही महाराष्ट्राच्या कन्येने उत्तुंग भरारी घेतली असून जिया करपेने देशात दुसरा क्रमांक पटकावला.

एनडीएच्या १५६ व्या आणि नेव्हल अकॅडमीच्या ११८ व्या तुकडीसाठी सप्टेंबर २०२५ मध्ये लेखी परीक्षा झाली होती. त्यानंतर झालेल्या अत्यंत खडतर अशा एसएसबी मुलाखतींमधून एसपीआयच्या २१ कॅडेट्सची अंतिम निवड झाली. या यशाचे वैशिष्ट्य म्हणजे, निवड झालेल्या २१ पैकी ६ विद्यार्थी हे देशातील पहिल्या १०० रँकिंगमध्ये झळकले आहेत. हे सर्व यशस्वी विद्यार्थी आता पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू होतील.

'जीएसपीआय'ची ऐतिहासिक झेपमुलींना सैन्यदलात संधी मिळावी यासाठी नाशिक येथे २०२२ मध्ये सुरू झालेल्या 'मुलींच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेने' अवघ्या तीन वर्षांत आपला राष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण केला आहे. मूळची सातारा येथील असलेल्या जिया करपे हिने या परीक्षेत 'ऑल इंडिया रँक ०२' प्राप्त करत इतिहास रचला. सातारा येथीलच समृद्धी इंगळे हिने १५ वी 'ऑल इंडिया रँक' मिळवून आपले स्थान निश्चित केले. या दोन्ही विद्यार्थिनींची नेव्हल अकॅडमीत प्रशिक्षणासाठी निवड झाली.

खडतर प्रशिक्षण आणि जिद्दसंभाजीनगरची 'एसपीआय' संस्था ही राज्य शासनाच्या वतीने चालवली जाते. या संस्थेच्या देखरेखीतच नाशिकच्या 'जीएसपीआय'चे कामकाज चालते. यूपीएससी लेखी परीक्षा आणि त्यानंतरची व्यक्तिमत्त्व चाचणी यासाठी येथे दर्जेदार प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांची जिद्द आणि मेहनत यामुळेच महाराष्ट्राचे विद्यार्थी संरक्षण दलात अधिकारी म्हणून रुजू होत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra's SPI shines! 21 students crack NDA exam.

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar's SPI continues its success streak. 21 students secured top ranks in the NDA exam, with six in the top 100. Gia Karpe topped among girls, securing the second rank nationally. These students will train at Khadakwasla.
टॅग्स :nda puneएनडीए पुणेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर