शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

भूममध्येही राष्ट्रवादीच

By admin | Updated: April 25, 2016 23:30 IST

भूम : तुळजापूर बाजार समितीच्या निवडणुकीनंतर भूम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत बाणगंगा शेतकरी विकास पॅनलने १७ पैकी १५ जागावर निर्विवाद विजय मिळविला

भूम : तुळजापूर बाजार समितीच्या निवडणुकीनंतर भूम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत बाणगंगा शेतकरी विकास पॅनलने १७ पैकी १५ जागावर निर्विवाद विजय मिळविला. शिवसेना-भाजपा-काँग्रेस या पक्षांनी एकत्रित येवून स्थापन केलेल्या अलमप्रभू शेतकरी विकास पॅनलला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. बाजार समितीच्या १७ जागांसाठी रविवारी मतदान पार पडल्यानंतर सोमवारी येथील जि. प. शाळेत पाच टेबलवर मतमोजणी करण्यात आली. प्रारंभी व्यापारी मतदार संघाची मोजणी झाली. यामध्ये एकूण दोन जागासाठी ५ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये सर्वपक्षीय पॅनलमधून काँग्रेस (आय) चे रोहन राजाराम जाधव हे विजयी झाले. तर दुसऱ्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाईकवाडी समाधान ईश्वर यांना २३ मते पडली. त्यांच्या विरोधात असलेले भाजपाचे लवटे वसंत सोनाजी यांनाही २३ मते पडली. दोघांनाही समसमान मते मिळाल्याने चिठ्या टाकून भाजपच्या वसंत सोनाजी लवटे यांना विजयी घोषित करण्यात आले. यानंतर ग्रामपंचायत मतदारसंघ, सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने चांगली मते घेऊन सेना, भाजपा, काँग्रेसचा धुव्वा उडविला. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी सेना भाजपा, काँग्रेस आय यांनी केलेली आघाडी व्यापारी मतदारसंघ वगळता सपशेल फेल ठरली. यामुळे सेना, भाजपा व काँग्रेस यांना आघाडी करूनही मतदारांनी नाकारले. १२ वाजेपर्यंत सर्वच जागांचे निकाल जाहीर झाले. यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोरदार आतषबाजी व गुलालाची उधळण करून जल्लोष केला. येथील शिवाजी खरेदी विक्री संघातही मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती. यामुळे मतदारांनी तरुण उमेदवारांना भरघोस मतदान केले असून, कृषी उत्पन्न बाजार समिती सक्षम करण्यासाठी काम करावे, अशा अपेक्षा व्यक्त होत आहेत. या प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. टी. सय्यद यांनी काम पाहिले. (वार्ताहर)राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचे संजय वसंतराव पाटील (३११), कैलास भीमा जाधव (३२१), नामदेव मारुती नागरगोजे (३४९), मिनाक्षी शिवाजी डोके (३६२), सुधा वसंत यादव (३५२), दिलीप बलभीम माळी (३६९), बलभीम चंदभान भसाड (३४३), सुरेश भागवत भोरे (३३७), विलास नरहरी चव्हाण (३१६), अशोक शेषराव गायकवाड (३२३), जयसिंग मनोहर गोफणे (३३२), रमेश विश्वंभर मस्कर (३३४), धोंडीअण्णा त्र्यंबक पवार (३२९), भगवान महादेव ढगे (२८८), युवराज दगडप्पा तांबे (२८१) विजयी ठरले तर सर्वपक्षीय अंलमप्रभू शेतकरी विकास पॅनलचे रोहन राजाराम जाधव (३३), वसंत सोनाजी लवटे (२३) विजयी झाले.