शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 22:49 IST

गुंतवणुकीवर दरमहा तीन टक्के व्याज देण्याचे आमिष देऊन शहरातील जवळपास २४०० ग्राहकांची ५० कोटी रुपयांची फसवणूक करणाºया हिरा ग्रुपच्या व्यवस्थापक नौहिरा शेख यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या टीमने कोटार्तून वॉरंट मिळवून मुंबईच्या कारागृहातून अटक केली. न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

औरंगाबाद : गुंतवणुकीवर दरमहा तीन टक्के व्याज देण्याचे आमिष देऊन शहरातील जवळपास २४०० ग्राहकांची ५० कोटी रुपयांची फसवणूक करणाºया हिरा ग्रुपच्या व्यवस्थापक नौहिरा शेख यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या टीमने कोटार्तून वॉरंट मिळवून मुंबईच्या कारागृहातून अटक केली. न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.कोर्टातून अटक वॉरंट मिळवून आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता नौहिरा शेख यांना ताब्यात घेतले. त्यांना घेऊन आर्थिक गुन्हे शाखेची टीम पहाटे औरंगाबादेत दाखल झाली. त्यांना दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.गुंतवणुकीची होणार चौकशीहिरा ग्रुपने औरंगाबादेतून तब्बल ५० कोटी रुपयांच्या ठेवी स्वीकारल्याचे दिसून येत आहे. ही रक्कम हिरा गोल्डच्या बँक खात्यात जमा केली होती. ही रक्कम कोठे गुंतविली, याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा पोलीस कोठडीदरम्यान करणार आहे. या रकमेतून औरंगाबादेत कोणती संपत्ती विकत घेतली का, याचीही चौकशी होणार आहे.हैदराबादच्या हिरा ग्रुप आॅफ कंपनीने गुंतवणूकदारांना आमिषाने पॉलसी विकल्या. २०१३ ते २०१७ पर्यंत या कंपनीत गुंतवणूक करणाºया नागरिकांच्या खात्यावर पैसाही जमा झाला. त्यामुळे औरंगाबाद शहरात गुंतवणूक करणारांची संख्या जवळपास २४०० वर पोहोचली; परंतु मे २०१८ नंतर कंपनीने खात्यावर व्याज जमा करण्याचे बंद केले. गुंतवलेली मुद्दलही देण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे शहागंज भागातील दुर्रेशहवार बेगम मुबशीर हुसेन यांच्या तक्रारीवरून व्यवस्थापक नौहिरा नन्नसाहेब शेख (४४, रा. तव्वाली चौक, वालीस कॉलनी, हैदराबाद) यांच्याविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पुन्हा चार जणांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. पोलिसांनी सिटीचौक भागातील हिरा ग्रुपच्या कार्यालयाची झडती घेऊन कागदपत्रे जप्त केली. या कागदपत्रांवरून औरंगाबाद शहरात तब्बल २४०० नागरिकांनी ५० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे समोर आले. हिरा ग्रुपने मुंबईत ५०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. मुंबई पोलिसांनी ग्रुपच्या प्रमुख नौहिरा शेख यांना हैदराबादेतून अटक केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनीही चौकशीसाठी नौहिरा यांना ताब्यात घेतले होते. औरंगाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी नौहिरा शेख यांना ताब्यात घेण्याचा अर्ज मुंबई न्यायालयात दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीInvestmentगुंतवणूकPoliceपोलिस