शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मराठी तरुणाईचा स्वभावच यशात अडथळा निर्माण करतो; यूपीएससी यशस्विता घुगे यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 20:03 IST

रे कुठे यूपीएससीसारख्या अवघड परीक्षांच्या वाट्याला जातो. त्यापेक्षा एमपीएससी आणि बाकीच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करूया, हा सर्वसाधारण मराठी तरुणाचा स्वभावच त्याच्या यशात अडथळा आणतो.

ठळक मुद्देमूळच्या अंबड तालुक्यातल्या असणाऱ्या डॉ. मोनिका यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथेच झाले.शारदा मंदिर शाळेत शिकत असताना तेथील शिक्षिकांनीच मला प्रशासकीय सेवांमध्ये करिअर करण्याचा मार्ग सुचविला, असे त्यांनी नमूद केले.

औरंगाबाद : अरे कुठे यूपीएससीसारख्या अवघड परीक्षांच्या वाट्याला जातो. त्यापेक्षा एमपीएससी आणि बाकीच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करूया, हा सर्वसाधारण मराठी तरुणाचा स्वभावच त्याच्या यशात अडथळा आणतो. आपण स्वप्नच बघत नाही म्हणून मागे राहतो. त्यामुळे स्वप्न बघा, यूपीएससी परीक्षांचाही विचार करा, असे प्रतिपादन यूपीएससी परीक्षेमध्ये ७६५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या डॉ. मोनिका घुगे यांनी केले.

मूळच्या अंबड तालुक्यातल्या असणाऱ्या डॉ. मोनिका यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथेच झाले. शारदा मंदिर शाळेत शिकत असताना तेथील शिक्षिकांनीच मला प्रशासकीय सेवांमध्ये करिअर करण्याचा मार्ग सुचविला, असे त्यांनी नमूद केले. या परीक्षांची तयारी करायची म्हणजे केवळ अभ्यास एके अभ्यास असे सूत्र अनेकांच्या मनात असते; पण या क्षेत्रात येण्यासाठी अभ्यासासोबतच तुमचा व्यक्तिमत्त्व विकास होण्याची गरज असते. यासाठी पालकांनीही मुलांच्या वेगवेगळ्या आवडी-निवडी ओळखून त्यांना छंदवर्गाला घालावे आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे चतुरस्त्र बनेल, यासाठी प्रयत्न करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

परीक्षेची तयारी कशी केली, हे सांगताना डॉ. मोनिका म्हणाल्या की, आपण अभ्यासाच्या तासांचे नव्हे तर अभ्यासाचे नियोजन केले. प्रत्येक दिवशी किती अभ्यास करायचा, हे ठरलेले असायचे. मग त्यासाठी किती तास लागतात, हे कधी पाहिले नाही. वाचन, मेडिटेशन, लिखाण यासारख्या छंदातून आपण अभ्यासाचा ताण घालवायचो, असेही त्यांनी  सांगितले. पंख्याखाली बसून जास्तीत जास्त वाचन करणे, म्हणजे अभ्यास. त्यामुळे अभ्यासाइतकी सोपी गोष्ट दुसरी कोणतीही नाही. लोकसेवा आयोगाच्या परीक्षांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदला. ‘झिंगणे’ या मराठवाडी गुणाचा वापर अभ्यासात ‘झिंगून’ जाण्यासाठी करा. मागे ओढणारे अनेक असतात, अशा लोकांपासून दूर राहा. कधीही कोणत्याही अपयशासाठी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

बुद्धिमत्तेच्या जोरावर करू शकतो मातमराठी माध्यमातली मुले कमी पडत नाहीत; पण लोकसेवा आयोगासाठी प्रमाण मानली जाणारी अनेक पुस्तके केवळ इंग्रजी भाषेतच असल्यामुळे निश्चितच इंग्रजी माध्यमाच्या मुलांपेक्षा त्यांना अधिक संघर्ष करावा लागतो, असे डॉ. मोनिका यांनी सांगितले.मुलाखतीच्या वेळी इंग्रजीमध्ये बोलण्याचा आत्मविश्वास इंग्रजी माध्यमातल्या मुलांमध्ये अधिक असतो; पण तरीही बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण या सगळ्या गोष्टीवर मात करूच शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगcollegeमहाविद्यालयSchoolशाळा