लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लावणी म्हणजे मराठी मनांचा ‘विक पॉइंट’ असतो. लावणीची नाल (ढोलकी) वाजायला लागली की नकळत पाय त्यावर ठेका धरू लागतात आणि मन गाऊ लागते. सखींनो लावणीची हीच मजा अनुभवायची नामी संधी तुम्हाला परत एकदा मिळणार आहे. लोकमत सखी मंच आणि कलर्स वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी सायं. ५ वा. लोकमत लॉन येथे ‘नटरंगी नार’ हा ठसकेदार लावणीचा कार्यक्रम रंगणारआहे.लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा कलाविष्कार या कार्यक्रमात सखींना पाहता येईल. केवळ सखी मंच सदस्यांसाठीच हा कार्यक्रम असणार आहे. कार्यक्रमस्थळी दुपारी १ वाजेपासून सखी मंच नावनोंदणी सुविधा उपलब्ध असेल.कलर्स वाहिनी ही आपल्या प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी आगळेवेगळे देण्याचा प्रयत्न करते. कलर्सची प्रत्येक मालिका एक नवा सामाजिक संदेश देणारी, प्रेक्षकांना उमेद देणारी असते. हीच परंपरा कायम ठेवत सध्या सुरू असणारी ‘तू आशिकी’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. पंक्ती शर्मा (जन्नत जुबेर रेहमानी) आणि अहान धनराजगीर (रित्विक अरोरा) या जोडप्याची पे्रमकहाणी अलगद उलगडून सांगणारी ही मालिका आता अतिशय रोमांचक वळणावर येऊन ठेपली आहे.अहान सर्वतोपरी पंक्तीला सहकार्य करीत आहे आणि जेडी अनिताचा उपयोग करून पंक्ती आणि अहान यांना वेगळे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावत आहे. पुढे काय होणार? पंक्तीचा संघर्ष कुठंवर यशस्वी होणार हे जाणून घेण्यासाठी बघत राहा कलर्स वाहिनीवर दर सोमवार ते शुक्रवार सायं. ७ वा. ‘तूआशिकी...’
औरंगाबादेत सखींच्या भेटीला येणार ‘नटरंगी नार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:05 IST
लावणी म्हणजे मराठी मनांचा ‘विक पॉइंट’ असतो. लावणीची नाल (ढोलकी) वाजायला लागली की नकळत पाय त्यावर ठेका धरू लागतात आणि मन गाऊ लागते. सखींनो लावणीची हीच मजा अनुभवायची नामी संधी तुम्हाला परत एकदा मिळणार आहे. लोकमत सखी मंच आणि कलर्स वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी सायं. ५ वा. लोकमत लॉन येथे ‘नटरंगी नार’ हा ठसकेदार लावणीचा कार्यक्रम रंगणार आहे.
औरंगाबादेत सखींच्या भेटीला येणार ‘नटरंगी नार’
ठळक मुद्देठसकेदार लावणी : लोकमत सखी मंच, कलर्स वाहिनीचा उपक्रम