राष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेत महाराष्ट्राला उपविजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 01:12 AM2017-12-11T01:12:30+5:302017-12-11T01:12:52+5:30

विभागीय क्रीडा संकुलावर नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय शालेय स्क्वॅश स्पर्धेत महाराष्ट्राने उपविजेतेपद पटकावले.

In the national squash tournament, Maharashtra won the runners-up | राष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेत महाराष्ट्राला उपविजेतेपद

राष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेत महाराष्ट्राला उपविजेतेपद

googlenewsNext

औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय शालेय स्क्वॅश स्पर्धेत महाराष्ट्राने उपविजेतेपद पटकावले. तामिळनाडूने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले, तर चंदीगडला तिसºया स्थानावर समाधान मानावे लागले.
निकाल (वैयक्तिक : १४ वर्षांखालील मुले) : १. सनी यादव, २. सोहम मेहता (महाराष्ट्र), ३. पृथ्वी यादव (चंदीगड). मुली : १. आयशा पटेल (मध्यप्रदेश), २. पूजा अथियार (तामिळनाडू), ३. अक्षया (तामिळनाडू). १७ वर्षांखालील मुले : १. पृथ्वी सिंग (चंदीगड), २. दीपक मंडल (महाराष्ट्र), ३. नवनीत (तामिळनाडू). मुली : १. अभिषेका सेनॉन (तामिळनाडू), २. मानवी जैन (महाराष्ट्र), ३. प्रतीक्षा (दिल्ली). १९ वर्षांखालील मुले : १. शिवम बन्सल (चंदीगड), २. यशवंत राघव (तामिळनाडू), ३. सूरज चंद (महाराष्ट्र). मुली : १. समिता एस., २. जे.एस. कृतिका (तामिळनाडू), ३. भावना गोयल (महाराष्ट्र). बक्षीस वितरण राज्य स्क्वॅश संघटनेचे अध्यक्ष प्रदीप खांड्रे, सचिव दयानंद कुमार, इम्तियाज खान, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, पंकज भारसाखळे, चंद्रशेखर घुगे, रणजित भारद्वाज, डॉ. संदीप जगताप, अजय मिश्रा, प्रशिक्षक कल्याण गाडेकर, सुशील शिंदे, सचिन पुरी, लता लोंढे, भाऊराव वीर यांच्या उपस्थितीत झाले.

Read in English

Web Title: In the national squash tournament, Maharashtra won the runners-up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.