शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
2
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
3
दहशतवाद्यांचे 'ऑल आउट'?; काश्मीरच्या वाढत्या दहशतवादाविषयी केंद्र सरकारची आज महत्त्वपूर्ण बैठक
4
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
5
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
6
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
7
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
8
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
9
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
10
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
11
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
12
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
13
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
14
विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर!
15
५९ देश, ६१ भाषांतील ३१४ चित्रपटांची मेजवानी
16
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
17
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
18
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
19
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
20
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान

राष्ट्रीय शालेय स्क्वॅश स्पर्धेत महाराष्ट्र तिन्ही गटांत उपांत्य फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 12:46 AM

विभागीय क्रीडा संकुलावर सुरू असलेल्य राष्ट्रीय शालेय स्क्वॅश स्पर्धेत महाराष्ट्राने १४ वर्षांखालील मुले व मुली आणि १७ वर्षांखालील मुलींच्या, अशा तिन्ही गटांत उपांत्य फेरीत धडक मारली.

औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर सुरू असलेल्य राष्ट्रीय शालेय स्क्वॅश स्पर्धेत महाराष्ट्राने १४ वर्षांखालील मुले व मुली आणि १७ वर्षांखालील मुलींच्या, अशा तिन्ही गटांत उपांत्य फेरीत धडक मारली.१४ वर्षांखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राने तामिळनाडूचा ३-०, दिल्लीने आसामचा ३-१, आसामने उत्तर प्रदेशचा ३-०, असा साखळी फेरीत पराभव केला. महाराष्ट्राची उपांत्य फेरीत चंदीगड आणि आसामची दिल्ली संघाविरुद्ध लढत होईल. मुलींच्या गटात महाराष्ट्राने गुजरातचा ३-१ असा पराभव केला. या गटात महाराष्ट्राची चंदीगड आणि तामिळनाडूची गुजरातविरुद्ध उपांत्य फेरीची लढत होईल.१७ वर्षांखालील मुलींच्या गटातील साखळी सामन्यात महाराष्ट्राने दिल्लीचा ३-१, चंदीगडने गुजरातचा ३-१, मध्यप्रदेशने विद्याभारतीचा ३-०, तामिळनाडूचा गुजरातने ३-० असा पराभव केला. या गटात महाराष्ट्राची चंदीगड आणि दिल्लीचा तामिळनाडूविरुद्ध उपांत्य फेरीत धडक मारली. तत्पूर्वी, या स्पर्धेचे उद्घाटन महसूल अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, विनायक ढाकणे, राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रदीप खांड्रे, सचिव दयानंद कुमार, पंकज भारसाखळे, चेतन अमीन, आनंद लाहोटी, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, जिल्हा संघटनेचे सचिव रणजित भारद्वाज, भाऊराव वीर यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन अमृत बिºहाडे यांनी केले. आभार गोकुळ तांदळे यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कृष्णा केंद्रे, लता लोंढे, उमेश बडवे, संजय वणवे, सचिन पुरी, कल्याण गाडेकर, रोहित गाडेकर, सुरेश मोरे, किशोर हिवराळे, दीपक भारद्वाज, सुशील शिंदे, राजकुमार गारोल, पिंटू राय आदी परिश्रम घेत आहेत.