शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

'वंदे भारत'चा नांदेड मुहूर्त ठरला'; एक दिवसात छत्रपती संभाजीनगरहून मुंबई अपडाऊन विसरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 17:50 IST

रेल्वेची मनमानी, लोकप्रतिनिधींच्या उदासीनता; वंदे भारत एक्स्प्रेस २६ ऑगस्टपासून सुटणार नांदेडहून

छत्रपती संभाजीनगर : मोठा गाजावाजा करून सुरू केलेली जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस अखेर २६ ऑगस्टपासून नांदेडहून धावणार आहे. ही रेल्वे नांदेडपर्यंत नेण्यास आणि वेळेत बदल करण्यास तीव्र विरोध झाला. मात्र, त्यानंतरही रेल्वेचा मनमानी कारभार आणि जालना, छत्रपती संभाजीनगरातील लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे ही रेल्वे नांदेडपर्यंत नेण्यावर शिक्कामोर्तब झाले. याचा सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगरकरांना बसणार आहे. ही रेल्वे नव्या वेळापत्रकानुसार अडीच तास उशिराने सुटेल. परिणामी, शहरवासीयांना रेल्वेने एका दिवसात मुंबईला ये-जा करणे थांबणार आहे.

जनशताब्दी एक्स्प्रेस छत्रपती संभाजीनगरहून जालन्यापर्यंत आणि नंतर हिंगोलीपर्यंत नेण्यात आली. परिणामी, छत्रपती संभाजीनगरकरांचा मुंबईला एका दिवसात ये-जा करणेच थांबले. मात्र, वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर शहरवासीयांना एका दिवसात मुंबईला ये-जा करणे शक्य झाले; परंतु आता ही रेल्वे नांदेडपर्यंत नेली जात असल्याने मुंबईत मुक्काम करण्याचीच वेळ येईल. वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडपर्यंत नेण्याचा आणि वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतल्याचे १२ जून रोजी समजले. मात्र, गेल्या महिनाभरात जालना, छत्रपती संभाजीनगरातील लोकप्रतिनिधींनी केलेला पाठपुरावा अपुरा पडल्यानेच ही रेल्वे नांदेडहून २६ ऑगस्टपासून सुटण्यावर आणि वेळापत्रकातील बदलावर शिक्कामाेर्तब झाल्याची ओरड सर्वसामान्य प्रवाशांतून होत आहे.

बोगींची संख्या ८ वरून २० वर; पण...सध्या वंदे भारत एक्स्प्रेस ही ८ बोगींची आहे. नांदेडहून सोडताना ती २० बोगींची होईल. त्यामुळे कोटा कमी होणार नाही, असे सांगितले जात आहे. मात्र, ही रेल्वे सध्या छत्रपती संभाजीनगरहून सकाळी ५:५० वाजता सुटते आणि दुपारी ११:५५ वाजेपर्यंत मुंबईला पोहोचते. नव्या वेळापत्रकानुसार ही रेल्वे छत्रपती संभाजीनगरहून सकाळी ८:१५ वाजता सुटेल आणि दुपारी २:२५ वाजता मुंबईला पोहोचेल. त्यामुळे सकाळी मुंबईला गेल्यानंतर सायंकाळी रेल्वेने परतणे अशक्य आहे. ‘वंदे भारत’ची अवस्था ‘जनशताब्दी’प्रमाणे होईल आणि प्रवाशांसाठी ती उपयोगी ठरणार नाही.

वेळ बदलण्यासाठी पाठपुरावाया रेल्वेची सध्याची वेळ कायम राहावी, यासाठी पाठपुरावा केला जाईल. बोगी वाढल्याने कोटा कमी होणार नाही, इतकाच दिलासा आहे.- अनंत बोरकर, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे कृती समिती

वेळ बदलावंदे भारत एक्स्प्रेस नांदेडपर्यंत नेताना जे वेळापत्रक तयार करण्यात आले, ते बदलण्याची मागणी केली जाईल. प्रवाशांना सकाळी ६ वाजता मुंबईसाठी रेल्वे उपलब्ध असावी.- संतोषकुमार सोमाणी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी सेना

वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रकस्थानकाचे नाव -२६ ऑगस्टपासून आगमन/ प्रस्थान - सध्याचे आगमन/ प्रस्थानहुजूर साहिब नांदेड - पहाटे ५ वा. -परभणी - ५:४० वा. / ५:४२ वा.-जालना- ७:२० वा./ ०७:२२वा.- पहाटे ५:०५ वा.छत्रपती संभाजीनगर - ८:१३ वा./८:१५वा.- ५:४५वा./५:५० वा.-अंकाई ९:४० वा. - ७:२५ वा.मनमाड जंक्शन ९:५८ वा./ १०:०३वा.- ७:३८ वा./७:४० वा.नाशिक रोड - ११ वा./ ११:०२ वा.-८:३५ वा./८:३७ वा.कल्याण - १:२० वा. / १:२२ वा.-१०:५५ वा/१०:५७ वा.ठाणे - १:४० वा. /१:४२वा.- ११:१० वा/११:१२ वा.दादर - २:०८ वा./ २:१०वा.- ११:३२ वा/११:३४ वा.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई २:२५ वा- ११:५५ वा.

टॅग्स :Vande Mataramवंदे मातरमchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरNandedनांदेडtourismपर्यटन