शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

नाना पटोलेंनी अपमान सहन करण्याऐवजी घरवापसी करावी, आ. संजय शिरसाट यांचा सल्ला

By बापू सोळुंके | Updated: April 8, 2024 19:57 IST

'औरंगाबाद, नाशिकची जागा शिवसेनेचीच आहे.'

छत्रपती संभाजीनगर: महाविकास आघाडीची उद्या बैठक आणि पत्रकार परिषद होणार आहे. या बैठकीला नाना पटोलेंना आमंत्रण नसेल, त्यांचा पदोपदी अपमान महाविकास आघडीत केला जात आहे. हा अपमान सहन करण्याऐवजी त्यांनी घरवापसी करावी, असा सल्ला शिंदे सेनेचे प्रवक्ते आ.संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत  दिला.

महायुतीचे  रखडलेल्या जागा वाटप कधी जाहिर होणार, या प्रश्नाचे उत्तर देताना आ. शिरसाट म्हणाले की, मुख्यमंत्री आज रामटेक मध्ये आहेत. तेथे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची बैठक आणि चर्चा झालेली आहे. आता उद्या पुन्हा महायुतीचे नेते एकत्र बसून उर्वरित सीटचे जागा वाटप करण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद, नाशिकची जागा शिवसेनेचीच आहे. नाशिक येथे हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आणि पक्षाचे संघटन आहेत. असे असताना आमच्या जागा देण्याचा प्रश्नच नाही. या दोन्ही जागांचा तिढा सुटला असल्याचे ते म्हणाले. झटपट सर्वेक्षणाच्या नावाखाली भाजपकडून शिवसेनेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे का,असे विचारले असता शिरसाट म्हणाले की, या सर्वेक्षणातून हे स्पष्ट होते की, महायुतीचाच उमेदवार निवडून येणार आहे.

खडसे, बबनराव घोलप यांच्यासह अनेक नेत्यांची घरवापसी होत आहे. पुढील आठ दिवसांत आणखी काही आमदार महायुतीत सामील होणार असल्याचे आ. शिरसाट यांनी सांगितले.  बाळासाहेब थोरात यांनीही खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. खरे तर संजय राऊत हे एका छोट्या पक्षाचे असताना ते महाविकास आघाडीचा प्रवक्ता असल्यासारखे बोलतात.  राऊत यांची अवस्था खूप वाईट होणार असल्याचेही ते म्हणाले. 

उद्धव ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये सभेची तारीख ठरल्याकडे लक्ष वेधले असता शिरसाट म्हणाले की, त्यांच्या सभांना प्रतिसाद किती मिळतो,यावरूनच त्यांचे उमेदवारांचे काय होईल हे स्पष्ट होईल. अमोल किर्तीकर यांना ईडीने नोटीस दिली असली तरी इडी च्या अधिकाऱ्यांच्या प्रश्नावलीला समर्पक उत्तरे दिल्यास काहीच त्रास होत नाही. ईडीच्या नोटीस या राजकीय दबावातून पाठविल्या जातात हे सर्व खोट असल्याचे त्यांनी नमूद केले. 

राज ठाकरे यांनी महायुतीत यावेमनसेचा उद्या पाडव्यानिमित्त मुंबईत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात ठाकरे हे त्यांची भूमिका मांडतील.पण त्यांनी महायुतीत यावे, अशी आमची अपेक्षा असल्याचे शिरसाट म्हणाले.

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना