शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

Namantar Andolan :नामांतर शहिदांच्या कुटुंबांच्या पुनर्वसनाचे काय? : मधुकर भोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 11:58 IST

लढा नामविस्ताराचा : नामांतर लढ्यात अनेकांचे बलिदान गेले. अनेक जण शहीद झाले; पण आज या शहिदांच्या कुटुंबांचे काय? त्यांच्या पुनर्वसनाचे काय? इतक्या वर्षांनंतरही हा प्रश्न भेडसावतोय. सतावतोय. त्यांच्यासाठी ना शासन काही करतेय... ना गट-तट घेऊन बसलेले राजकीय नेते? अशी तळमळ मधुकर भोळे यांनी व्यक्त केली. १४ जानेवारी नामविस्तारदिनी विद्यापीठ गेटवरील सभांवर व इतर गोष्टींवर होणारा खर्च टाळून एक एक कुटुंब दत्तक घेऊन ही अशी मदत करता येईल, अशी सूचनाही त्यांनी मांडली.

- स. सो. खंडाळकर

नामविस्तार दिनाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ते ‘लोकमत’शी बोलत होते. मधुकर भोळे त्याकाळी सर्वंकष क्रांती दलाच्या माध्यमातून काम करीत होते. शिक्षण क्षेत्रातही ते नाव कमावत होते. प्रारंभापासूनच भोळे हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते राहिलेले. नामांतर लढ्यातही त्यांनी हिरिरीचा सहभाग घेतलेला. अधिवेशने भरवणे, सत्याग्रहात सहभाग नोंदवणे, असा त्यांचा सिलसिला सुरूच होता. दिवंगत महाकवी वामनदादा कर्डक हे हयात असतानाच संदर्भ ग्रंथ ठरावा, असा गौरव ग्रंथ प्रकाशित करण्याचे कार्य भोळे यांनी केले. ते गेल्यानंतर दरवर्षी दिवंगत कवी सिद्धार्थ जाधव यांच्या सहकार्याने ‘गाणी वामनाची’ हा कार्यक्रम आॅगस्टमध्ये भोळे हे आयोजित करीत असतात.

खरे तर नामांतराचा लढा प्रदीर्घ लढावा लागला. त्यात भरीव योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणे पेन्शन सुरू करण्याची मागणी करून मधुकर भोळे यांनी लढ्यातील आठवणींना उजाळा दिला. नामांतराचा ठराव दोन्ही सभागृहात संमत होऊनही त्याची अंमलबजावणी का होत नाही, असा जाब आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी विचारला होता. नामांतर ठरावाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांना मतदारसंघात गेल्यानंतर विरोधाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे या ठरावाची अंमलबजावणी करणे अशक्य होऊन बसले होते, असे पवार यांनी त्यावेळी सांगितले होते.

पुढे आम्ही ३० आॅक्टोबर १९८४ रोजी एम.पी. लॉ कॉलेजच्या मैदानावर अधिवेशन घेतले. त्याचे उद्घाटन शरद पवार यांनीच केले होते. सर्वांना विश्वासात घेऊन नामांतर करू, असा शब्द त्यांनी त्यावेळी दिला होता.  भडकलगेट येथे १९८३ साली सत्याग्रह झाला. आम्हा कार्यकर्त्यांना पोलिसांनी हर्सूल कारागृहात आणले.  गुन्हा मान्य न केल्याने आम्हा सर्वांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. हर्सूलमध्ये सात दिवस राहून बाहेर आलो. असा सारा हा संघर्षाचा इतिहास आहे. त्यांतर हा नामाविस्तार झाला. त्याचे सोने झाले पाहिजे, असे मात्र मला मनोमन वाटते, असे भोळे यांनी नमूद केले. 

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा