शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

Namantar Andolan : अत्याचाराला बळी पडलेल्यांची सिद्धार्थनगरमध्येच नामांतर कॉलनी वसवली : दौलत खरात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 12:59 IST

लढा नामविस्ताराचा : आणीबाणी संपल्यानंतर दलित पँथरतर्फे काय कृती कार्यक्रम सुरू करायचा यावर औरंगाबादेत आठवले वाड्यावर बैठक झाली. त्यातली चर्चा संपल्यानंतर आम्ही सारे कार्यकर्ते म.भि. चिटणीसांकडे गेलो. नामांतराच्या मुद्यावर लढा उभा करायला काहीच हरकत नाही, असा सल्ला त्यांनी दिला. त्यानंतर मग आम्ही प्राचार्य राजाराम राठोड यांच्याकडे आलो. त्यांनाही आमचे म्हणणे पटले. इतकचे नव्हे, तर त्यांनी आम्हाला सतत आर्थिक सहकार्यही केले. त्यावेळी या लढ्याचे एवढे गांभीर्य वाटत नव्हते. विद्यार्थी हाच याचा कणा होता. तेच त्यात सहभागी होत असत.

- स. सो. खंडाळकर

बदनापूरजवळील अकोला निकळक व गंगापूर तालुक्यातील आपेगावच्या दलितांच्या घरादारांची राखरांगोळी करण्यात आली होती. त्यामुळे त्यांचे पुनवर्सन करणे गरजेचे होते. ज्या गावाने आमची घरेदारे जाळली, तेथे आम्ही पुन्हा राहायला जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. जिल्हा प्रशासनातर्फे हर्सूलच्या नदीत त्यांना राहण्यासाठी तात्पुरती जागा देण्यात आली; परंतु ती जागाही राहण्यायोग्य नसल्याने मी स्वत: पुढाकार घेऊन सिद्धार्थनगरातील जागा दिली. एकूण ३७ कुटंबांची त्याठिकाणी राहण्याची सोय केली. नामांतर कॉलनी म्हणून ही वसाहत ओळखली जाऊ लागली. पुढे माझी पत्नी नगरसेविका झाल्यानंतर नामांतर कॉलनीची कमान उभी केली गेली, अशी माहिती तत्कालीन दलित पँथरचे नेते व आता ‘रिपाइं-ए’चे वरिष्ठ नेते दौलत खरात यांनी दिली. नामविस्ताराच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘लोकमत’शी ते बोलत होते. 

‘लोकमत’मुळे ताकद मिळाली त्यांनी सांगितले की, १९८२ साली ‘लोकमत’औरंगाबादहून सुरू झाला आणि नामांतरवाद्यांना एक मोठी ताकद मिळाली. ‘लोकमत’मुळे नामांतर विरोधाची धार बोथट व्हायला फार मोठी मदत झाली. त्याआधी नामांतराच्या विरोधात विषारी लिखाण होत होते. दंगली भडकाविण्यास हे लिखाणच कारणीभूत होत गेले. ‘लोकमत’मुळे नामांतर लढ्याला बळ मिळाले आणि ही लढाई जोरात सुरू होऊन रंगत गेली व त्यात यशही मिळाले. नामांतर लढ्यामुळे दलित कार्यकर्ता धीट व स्वाभिमानी बनला. 

दलितांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले आणि देशभरात ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची विद्यापीठे सुरू होत गेली. हे एक प्रकारचे मोठे योगदानच होय. शिवाय या लढ्यात जे शहीद झाले, त्यांची कुटुंबे खचून न जाता तेवढ्याच ताकदीने उभी राहिली. उलट त्यांना लढ्यातील बलिदानाबद्दल गर्व वाटू लागला. विद्यापीठ सिनेटमध्ये नामांतराचा ठराव संमत झाला, त्यादिवशी स.भु.च्या मैदानावरून मोठा मोर्चा काढण्यात आला होता. त्याचे नेतृत्व मी करीत होतो. पुढे २७ जुलै १९७८ रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत नामांतर ठराव मंजूर झाला आणि मराठवाडाभर दंगली उसळल्या, असा घटनाक्रम दौलत खरात एक-एक करून उलगडून सांगत होते. 

त्यांनी सांगितले, ६ डिसेंबर १९७९ च्या क्रांतीचौकातील सत्याग्रहात मलाही अटक करून हर्सूल जेलमध्ये ठेवण्यात आले. पुढे दलित पँथरच्या माध्यमातून आंदोलने होत राहिली. त्यात  माझा हिरीरीचा  सहभाग राहत असे. माईसाहेब आंबेडकर यांना अटक झाली. त्यावेळी आम्ही कार्यकर्ते त्यांच्याबोरबर जेलमध्ये राहिलो. किंबहुना हर्सूल जेलमध्ये एक ओपन जेलच उघडून त्याठिकाणी कार्यकर्त्यांना ठेवले जात असे.

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा