शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
2
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
3
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
4
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
5
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
6
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
7
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
8
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
9
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
10
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
11
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
12
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
13
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
14
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
15
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
16
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
17
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
18
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
19
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
20
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत

Namantar Andolan : नामांतराच्या लोकलढ्यात लोकमानस घडविण्यात ‘लोकमत’च अग्रेसर

By शांतीलाल गायकवाड | Updated: January 14, 2019 14:02 IST

मराठवाड्यात दीनदलितांच्या जीवनमरणाचे प्रश्नही लोकमतने वेशीला टांगले. मराठवाडा भूमीशी सेवा समर्पणाच्या भावनेने समरस  होऊन लोकमतने समाज प्रबोधनाचा घेतलेला वसा नामविस्तार होईपर्यंत १६ वर्षे सातत्याने माध्यमाच्या पातळीवर अक्षरश: एक हातीच लढला. त्यात आजही खंड नाही. 

‘ खींचो न कमानोंको न तलवार निकालोजब तोप मुकाबिल हो तो अखबार निकालो’  

अकबर इलाहाबादी यांचा हा शेर असो की, संत तुकडोजी महाराजांनी  ग्रामगीतेत म्हटल्यानुसार,  ‘न धरी हाती तलवार, बुद्ध राज्य करी जगावरीकारण असे एक, प्रचार’ . 

हा अभंग असो...ही कवने माध्यमांचे महत्व प्रचार, प्रसार करून जनमत  घडविण्यात अनन्यसाधारण असेच असल्याचे सांगते. नामांतराच्या मुद्द्यावरून मराठवाड्यात उसळलेला आगडोंब हा जातीच्या स्फोटक दारू कोठारावर प्रसारमाध्यमांनी, वृत्तपत्रांनी टाकलेल्या ठिणगीचे अमानवी रुपच होते. वृत्तपत्राच्या आगलाव्या, विषमतावादी व एकांगी भूमिकेमुळे मराठवाड्यातील दलित-नवबौद्धावर अनन्वीत अत्याचार झाले.  हा काळाकुट्ट इतिहास ताजा आहे. 

९ जानेवारी १९८२ रोजी मराठवाड्यात लोकमतचे आगमन होईपर्यंत नामांतर लढ्याने मन व मतभेदासह असहिष्णुतेचा प्रारंभिक अध्याय लिहून  काढला होता. महाराष्ट्राच्या १५० वर्षातील आगरकर, फुले, शाहू, आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांनी  घडविलेली प्रबोधनाची परंपरा पुढे नेण्याचे ध्येय लोकमतने ठरविले व हाती समाजसेवेचे कंकण बांधले. याचे प्रत्यंतर अगदी प्रारंभीच्या दि. १० जानेवारी १९८२च्या ‘शुभारंभ विशेषांक’ातूनच आले. चळवळीला वाहिलेल्या अस्मितादर्श सारख्या काही नियतकालीका वगळता एरव्ही दलित चळवळ, आंबेडकरी तत्वज्ञानाकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करणारी किंवा अनुल्लेखाने मारणारी वृत्तपत्रेच या संतभूमित मान्यता पावली होती. लोकमतने शुभारंभाच्या विशेषांकात ‘मराठवाड्यातील शैक्षणिक प्रगतीत डॉ. बाबासाहेबांचे योगदान’ व ‘दलितांच्या सामाजिक सांस्कृतिक चळवळी’ हे अनुक्रमे प्राचार्य म.भि. चिटणीस व डॉ. गंगाधर पानतावणे यांचे विस्तृत लेख प्रकाशीत करून प्रस्थापितांना धक्का देत लोकांच्या आवाजाचा हुंकार आपण बनणार आहोत, हे दर्शविले. अर्थात लोकमत मराठवाड्यात येण्यापूर्वी नागपुरातही मुख्य संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या नेतृत्वाखाली आपली ही सामाजिक बांधिलकी कायम राखून होता. प्रा. सर कवाडे यांच्या नेतृत्वाखाली ११ नोव्हेंबर १९७९ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमिहून निघालेल्या नामांतर लॉगमार्चचे  ‘नामांतर करूनच परत येऊ’ अशा निर्धारात ‘लॉगमार्च’ला प्रारंभ’  असे भव्य वृत्त लोकमतने दिले होते. तत्पूर्वी नागपुरात निघालेला नामांतर मोर्चा व त्यात पोलीस गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या ५ नागरिकांविषयीचे  वार्तांकनही मनाला गलबलून सोडणारे आहे. 

मराठवाड्यात दीनदलितांच्या जीवनमरणाचे प्रश्नही लोकमतने वेशीला टांगले. मराठवाडा भूमीशी सेवा समर्पणाच्या भावनेने समरस  होऊन लोकमतने समाज प्रबोधनाचा घेतलेला वसा नामविस्तार होईपर्यंत १६ वर्षे सातत्याने माध्यमाच्या पातळीवर अक्षरश: एक हातीच लढला. त्यात आजही खंड नाही. तत्कालीन कार्यकारी संपादक म.य. उर्फ बाबा दळवी यांनी या काळात लिहिलेले अग्रलेख, लेखातून लोकमतने नामांतराला वैचारिक मार्गदर्शनही केले. एव्हढेच नव्हे तर बाबा दळवी प्रत्यक्ष नामांतर लढ्यात ही अग्रभागी होते. नामांतरासाठी स्थापन झालेल्या विद्यार्थी नागरिक कृति समितीचे बाबा दळवी कार्याध्यक्ष होते.  त्यामुळे लोकमतने वैचारिकच नव्हे तर लढ्यात प्रत्यक्ष सहभागही दिला. 

१६ वर्षाच्या संघर्षात दलित - दलितेतर अनेक संघटनांनी नामांतरासाठी लढा दिला. या प्रत्येक घटनेची, आंदोलनाची नोंद लोकमतने तत्काळ घेऊन ती बाब समाजापुढे नेली आहे. अगदी बारिकातील बारिक तपशील लोकमतने नोंदविले आहेत. लोकमतमधून प्रसिद्ध होणाऱ्या बहुतांश सदरातून नामांतरास जागा मिळाली. साहित्याला वाहिलेली साहित्यजत्रा पुरवणी असो की चित्रपटांच्या रंगोली पुरवणीमध्येही, नामांतराविषयी मतमतांतरे आहेच.  लेख, अग्रलेख, वाचकांच्या  पत्रव्यवहाराचे ‘खुले व्यासपीठ’ , ‘झेप’ असो वा ‘औरंगाबादी फेरफटका’, ‘कॅमेरावाला’कुठेच नामांतराच्या बातम्या, लेख वर्ज्य नाहीत. यानिमित्ताने नामांतर आंदोलनाचे अनेक कंगोरे वाचकासमोर आणण्यात लोकमत यशस्वी ठरले. उण्यापुऱ्या दीड तपाच्या या काळात प्रत्येक महिन्यात अग्रलेख, लेख, पत्रे, बातम्या  असे नामांतराविषयी सरासरी १० ते १२ वृत्ते लोकमतमधून प्रसिद्ध झाले. त्यातील बहुतांश वृत्तांत सकारात्मक बाजू मांडणारे, माहिती देणारे आहेत. 

‘नामांतर लढा एक शोध यात्रा’ या पुस्तकात प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे लिहितात, ‘‘१९७७ व १९७८ साली मराठवाड्यात नामांतरविरोधी दैनिके  प्रमुख होती. १९९३-९४ साली मराठवाड्यात नामांतरवादी दैनिके सर्वाधिक खपाची व जास्त वितरण होणारी व संख्येनेही जास्त होती’. डॉ. गव्हाणे पुढे लिहितात, ‘‘ माझे एक अभ्यासू मित्र प्रकाश कापडे यांनी ‘ विद्यापीठ नामांतराबाबत वृत्तपत्रांची भूमिका : तुलनात्मक अभ्यास हा लघू प्रबंध मे ९३-९४मध्ये एम.एम.सी.जे. परीक्षेसाठी माझ्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला आहे. त्या लघुप्रबंधात त्यांनी १ जानेवारी ते ३१ जानेवारी १९९४ या कालावधीत नामांतराबाबत दै. लोकमत, दै.मराठवाडा व दै. सामनाच्या बातम्या, लेख, छायाचित्रे यांचा अभ्यास केला. त्यात त्यांना असे आढळले की, दै. लोकमत (औरंगाबाद) ने महिन्यात छापलेल्या एकूण नामांतराच्या २६१ बातम्यांपैकी १७६ बातम्या (६२ टक्के नामांतर बातम्यांची जागा) नामांतरवादीच्या बाजूच्या दिल्या आहेत. तर ८५ बातम्या (३८ टक्के नामांतर बातम्यांची जागा) नामांतर विरोधीबाजुच्या दिल्या आहेत. दै. मराठवाडाने नामांतरच्या २५४  बातम्या छापल्या व त्यातील १३१ नामांतरवादी होत्या. त्यांना जागा मात्र ३६ टक्के मिळाली. तर नामांतरविरोधी १२३ बातम्या छापल्या.  ही संख्या नामांतरवादी बातम्यांच्या जवळपास वाटते, पण दै. मराठवाडाने नामांतरविरोधी बातम्यांना ६४ टक्के जागा दिली आहे. नामांतरविरोधी बातम्या आकाराने मोठ्या दै. मराठवाडाने दिल्या आहेत. यावरून दै. मराठवाडाची भूमिका दै. लोकमतपेक्षा भिन्न आणि १९७८ प्रमाणेच पण सौम्य होती असे म्हणावे लागते. ’’

अमृत महोत्सवी नागरी सत्काराला उत्तर देतांना बाबा दळवी म्हणतात, ‘ नामांतराच्या बाबतीत  लोकमतने जे काही केले ते कोणत्याही मराठी  वृत्तपत्राने केले नाही. दळवी पुढे म्हणतात, ‘‘गेल्या १६ वर्षापासून मी लोकमतमध्ये आहे. तुम्ही असे का केलं, तुम्ही असं का लिहिलं ? असं मला कधीही विचारले गेले नाही. लोकमतमध्ये राहूनच मी नामांतराच्या प्रश्नावर तुरुंगवास भोगला . नागपुरात अंधश्रद्धाविरोधी चळवळ चालविली, झोपडपट््टयांचे प्रश्न हाती घेतले. लोकमतने हे मला हे करू दिले त्याबद्दल त्यांनाही श्रेय जावे.’’

दबाब झुगारून भूमिकेवर ठाममानवतावादी प्रबोधनाची परंपरा जपण्याचे असीधारावृत्त लोकमतने प्रारंभापासूनच जोपासले व हा वसा कधीही सोडला नाही. नामांतर चळवळीत सामाजिक दुफळी झालेली असतांना नामांतरविषयी तुमची भुमिका बदला असा दबाब चोहीबाजूंनी लोकमतचे संपादक राजेंद्र दर्डा यांच्यावर येत होता. पण त्यांनी समता व ममत्वाला प्रधान्य देत आपल्या भुमिकेत तसूभरही बदल केला नाही.  ते नामांतराच्या भुमिकेवर ठामच राहिले. त्यामुळेच लोकमत नामांतराच्या लढ्यात सतत अग्रेसर राहिला. नामविस्ताराच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त  सध्या प्रसिद्ध होत असलेल्या मुलाखतीमधूनही  जवळपास सर्वांनिच लोकमतचे बहुमूल्य योगदान आधोरेखित केले आहे.     लोकमतने घेतलेल्या खंद्या भुमिकेचे दलित समाज व चळवळीनेही उत्स्फूर्त स्वागतच केले व लोकमतवर सर्वस्वी प्रेमही केले. त्यात सातत्याने वाढतच होते आहे, अशी भावना  महापालिका स्थायीसमितीचे माजी सभापती  रतनकुमार पंडागळे यांनी व्यक्त केली. 

नामविस्ताराचा तिळगुळ मुख्यमंत्री शरद पवार यांनी मराठवाड्यातील  जनतेला दिला व लोकमतने या घटनेची ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ अशी स्कायलाईन छापली. अशांतता ही विकासाला मारकच. म्हणून येथील जनतेची मने जुळायला हवी त्यातूनच विकास शक्य असल्याचे सांगत लोकमतचे तत्कालीन संपादक राजेंद्र दर्डा, ‘ आता हवे आहे... प्रेम आणि शांतता’ हा विशेष लेख लिहून भाईचारा वाढवा, शांती प्रस्थापित करण्याचे आवाहन करतात. या मातीविषयी असलेले प्रेमच त्यातून व्यक्त होते.     संत तुकारामांनी म्हटल्यानुसार, ‘ बुडती हे जन न देखवे डोळवा म्हणून कळवळा येतुयाशी.... 

- शांतीलाल गायकवाड 

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा