शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

Namantar Andolan : नामांतराच्या वातावरण निर्मितीसाठी साऱ्यांनी प्रयत्न केले : जनार्दन वाघमारे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 18:20 IST

लढा नामविस्ताराचा : प्राचार्य ना. य. डोळे, प्राचार्य भगवानराव सबनीस, प्राचार्य राजाराम राठोड, प्राचार्य गजमल माळी असे आम्ही नामांतराचा पाठपुरावा करीत होतो. बरीचशी प्राध्यापक मंडळीही आमच्या बरोबर होती. ठिकठिकाणी आम्ही बैठकाही घेतल्या; पण नामांतराचा प्रश्न प्रलंबित पडला. जवळपास १७-१८ वर्षे हा प्रश्न लोंबकळलेला होता. नंतर पुन्हा हा प्रश्न चिघळला; पण सर्वांना विश्वासात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मार्ग काढला.

- स. सो. खंडाळकर

शरद पवार हे दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी विद्यापीठ नामांतराचा प्रश्न धसास लावण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यासाठी वातावरण निर्मितीची गरज होती. आम्हा सगळ्यांना त्यांनी हे वातावरण निर्माण करण्याचे आवाहन केले होते. त्यादृष्टीने आम्ही सर्वजण कार्यरत होतो. त्याला शेवटी यश आले. नामांतराऐवजी नामविस्तार झाला. मराठवाडा हे नाव कायम ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव देण्यात आले. ही घटना केवळ दलितांच्याच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरली,’ असे स्पष्ट प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू प्राचार्य जनार्दन वाघमारे यांनी केले. 

नामविस्ताराच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ते ‘लोकमत’शी बोलत होते. प्राचार्य जनार्दन वाघमारे या नावाचा लातूर भागात किंबहुना मराठवाडा-महाराष्ट्रात दबदबा... ख्यातकीर्त विचारवंत, साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ अशी त्यांची प्रतिमा. आपल्या पुरोगामी विचारांचा ठसा त्यांनी उमटवलेला. ते म्हणाले, नामांतर चळवळीत मी होतोच. नामांतर हा समतेचा लढा होता, असे माझे मत होते. मराठवाड्यातील उच्चशिक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाची १९५० साली स्थापना केली होती. या भागासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे, असे त्यांना वाटत होते. मराठवाडा पुढे यावा यासाठी ते प्रयत्नशील होते. 

पुढे विद्यापीठ स्थापन होऊन त्याच्या नामांतराचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा मराठवाड्यात विरोध झाला. दलितांची घरे-दारे जाळली गेली. पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने ही अतिशय वाईट घटना घडली. म्हणून महाराष्ट्रातील पुरोगामी व्यक्तींनी नामांतराचा पाठपुरावा सुरू ठेवला. त्यात मीही होतो. 

विषमता निर्मूलन परिषद घेतली... डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली लातूरला मी विषमता निर्मूलन परिषदेचे आयोजन केले होते. त्यात महाराष्ट्रातील तीनशे प्रतिनिधींनी भाग घेतला होता. प्रा. गं. बा. सरदार यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. पुरोगामी विचारवंत व नेते यावेळी उपस्थित होते. प्राचार्य म. भि. चिटणीस, भाई उद्धवराव पाटील, बापूसाहेब काळदाते ही मंडळीही उपस्थित होती. या परिषदेची सांगता आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ केली. ही परिषद होऊ नये म्हणून अनेक जण प्रयत्न करीत होते. त्या काळात मला खूप त्रास देण्यात आला, असे खेदाने प्राचार्य वाघमारे यांनी नमूद केले. 

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा