शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नाले सफाईच्या कामाची महापालिकेकडून उलटतपासणी; दर्जाबाबत अभिप्राय देण्याचे नागरिकांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 18:45 IST

Aurangabad Municipal Corporation नालेसफाईची कामे गतवर्षी मे महिन्याच्या शेवटी व जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आली होती.

ठळक मुद्देशहरातील नालेसफाईवर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. ही कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी संपणे अपेक्षित असते

औरंगाबाद : महापालिकेने मागील वर्षी पावसाळ्यात नालेसफाईवर तब्बल १ कोटी ५१ लाख ७ हजार ३२६ रुपये खर्च केले. कंत्राटदारांनी नालेसफाईच्या कामांची बिले प्रशासनाला सादर केली. बिल अद्याप देण्यात आलेले नाही. त्यामुळे महापालिकेचे प्रशासक यांनी विविध नाले व एकत्रित बिलांची यादी जाहीर केली असून, ही कामे समाधानकारक झाली आहेत का? याचा अभिप्राय नागरिकांनी दहा दिवसांच्या आत द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

शहरातील नालेसफाईवर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. ही कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी संपणे अपेक्षित असते; पण प्रत्येक वर्षी विलंबाने कामे सुरू केली जातात. पावसाच्या पाण्यामुळे नाले स्वच्छ झाले का, कंत्राटदारांनी केले, हे कोणालाही कळत नाही. नाल्यातील दर्शनी भागात गाळ काढून ठेवण्यात येतो. हा गाळ नंतर आपोआप गायब होतो. कंत्राटदाराला गाळ वाहतुकीचा खर्च वाचतो, असा आरोप वारंवार केला जातो.

काही वर्षांपूर्वी शहरातील संपूर्ण नाल्यांच्या सफाईचे एकत्रित कंत्राट दिले जात होते. ही निविदा कोट्यवधी रुपयांची असायची. त्यावर टीका सुरू झाल्यानंतर काही कामे महापालिकेमार्फत तर मोठ्या नाल्यांची कामे कंत्राटदारामार्फत केली जात आहेत. असे असले तरी गतवर्षी १ कोटी ५२ लाख ५७ हजारांचे नऊ प्रभागातील कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. प्रत्यक्षात १ कोटी ५१ लाख ७ हजार ३२६ रुपयांचा खर्च केला. या कामांची बिले कंत्राटदारांनी लेखा विभागाला सादर केली आहेत. प्रशासक यांनी नऊ प्रभागांतील कामे व त्यांची बिले महापालिकेच्या सोशल मीडियाच्या पेजवर टाकली आहेत. त्यात ९६०७९३३५४१ हा क्रमांक देण्यात आला आहे. या क्रमांकावर व्हॅाट्‌सॲपद्वारे अभिप्राय कळवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सोबत कंत्राटदारांनी बिलाला जोडलेले छायाचित्रेही टाकण्यात आली आहेत.

वर्षभरात नाल्यांमध्ये गाळ, कचरा दिसणारचनालेसफाईची कामे गतवर्षी मे महिन्याच्या शेवटी व जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आली होती. त्याला दोन महिन्यांनी वर्ष होणार आहे. त्यामुळे नागरिकांना गतवर्षी झालेल्या कामांची आठवण राहणार आहे का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. सध्या शहरातील सर्व नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका