शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर जयंतीनिमित्त मिलिंद परिसरात ‘नागसेन फेस्टिव्हल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 17:08 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या नागसेनवनात आजी-माजी विद्यार्थ्यांतर्फे आंबेडकर जयंतीनिमित्त ‘नागसेन फेस्टिव्हल’चे आयोजन केले आहे. 

औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या नागसेनवनात आजी-माजी विद्यार्थ्यांतर्फे आंबेडकर जयंतीनिमित्त ‘नागसेन फेस्टिव्हल’चे आयोजन केले आहे. या फेस्टिव्हलमध्ये नागसेनवनातील माजी विद्यार्थी प्रतापसिंग बोदडे यांना ‘नागसेन गौरव पुरस्कारा’ने गौरविण्यात येणार असल्याची माहिती निमंत्रक सचिन निकम यांनी दिली.

दोन वर्षांपासून नागसेन फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी हा फेस्टिव्हल ३०, ३१ मार्च, १ एप्रिल आणि ११ एप्रिल रोजी नागसेनवनातील लुम्बिनी उद्यानात सायंकाळी साडेपाच ते १० वाजेपर्यंत आयोजित केला आहे. या फेस्टिव्हलमध्ये विविध प्रकारचे समाजप्रबोधनाचे कार्यक्रम, व्याख्यान, विविध स्पर्धा, नाट्य, एकांकिकाचे आयोजन केले आहे.या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सचिन निकम, अविनाश कांबळे, सिद्धार्थ मोकळे, मेघानंद जाधव, प्रा. किशोर वाघ, अरुण शिरसाठ, अतुल कांबळे, आनंद सूर्यवंशी, कुणाल भालेराव, चिरंजीव मनवर, विवेक सोनवणे, विशाल देहाडे आदींनी केले आहे.

विविध क्षेत्रात ठसा उमटविलेल्यांचा सत्कारनागसेनवनात शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात ठसा उमटविलेल्या माजी विद्यार्थ्याला ‘नागसेन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित केले जाते. यावर्षी हा पुरस्कार वामनदादा कर्डक यांचे शिष्य व मिलिंद कला महाविद्यालयाच्या १९६८ च्या बॅचचे विद्यार्थी प्रतापसिंग बोदडे यांना प्रदान केला जाणार आहे. बोदडे यांनी नागसेनवनातूनच बी. ए., एम. ए. चे शिक्षण घेत रेल्वे विभागात आपली छाप पाडली. याशिवाय नोकरीत असतानाही आंबेडकरी चळवळीसाठी भीमगीत, गजल, कवितांचे लिखाण केले आहे. याची दखल घेत त्यांना १ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित कार्यक्रमात सन्मानित केले जाणार असल्याचे सचिन निकम यांनी सांगितले.

टॅग्स :Milind College Aurangabadमिलिंद महाविद्यालय औरंगाबादNagsen vanनागसेन वनAurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर