शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी नागपूर ते पंढरपूर जागरण यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 00:50 IST

धनगरांचे आंदोलन उग्र राहील, पण आम्ही सरकारी मालमत्तेचे नुकसान करणार नाही. या आंदोलनाचा एक भाग नागपूर ते पंढरपूर, अशी पंधरा दिवसांची जागरण यात्रा काढण्यात येईल. या यात्रेची तारीख पुण्याच्या बैठकीत ठरविण्यात येईल, अशी माहिती आज येथे धनगर समाज आरक्षण समन्वय समितीच्या नेत्यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : धनगरांच्या बळावर सत्ता उबवत असलेले सध्याचे सरकार निर्लज्ज आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगरांना आरक्षण जाहीर करू असे आश्वासन दिले होते. परंतु २३ जुलै रोजी सरकारने न्यायालयात ९६२ पानांचे आपले म्हणणे धनगर आरक्षणाच्या विरोधात मांडले आहे. त्यामुळे धनगर समाजात असंतोष खदखदतोय. येत्या ५ आॅगस्ट रोजी धनगर समाज आरक्षण समन्वय समितीची पुणे येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात राज्यव्यापी लढ्याची दिशा ठरविण्यात येईल. धनगरांचे आंदोलन उग्र राहील, पण आम्ही सरकारी मालमत्तेचे नुकसान करणार नाही. या आंदोलनाचा एक भाग नागपूर ते पंढरपूर, अशी पंधरा दिवसांची जागरण यात्रा काढण्यात येईल. या यात्रेची तारीख पुण्याच्या बैठकीत ठरविण्यात येईल, अशी माहिती आज येथे धनगर समाज आरक्षण समन्वय समितीच्या नेत्यांनी दिली.यासंदर्भात माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रपरिषदेस पांडुरंगअण्णा मेरगळ (दौंड), राम गावडे (पुणे), अ‍ॅड. संदीपान नरवटे (औरंगाबाद), विठ्ठल महारगर (धुळे), प्रा. तुकाराम साठे (परभणी), बाळासाहेब होळकर (लातूर), रामचंद्र पोले (औरंगाबाद), रामविजय बुरुंगले (विदर्भ), प्रा. सदाशिव ढाके, मनजित कोळेकर आदींची उपस्थिती होती.धनगर समाज आरक्षण समन्वय समितीची काल दिवसभर रामचंद्र हॉल, बीड बायपास येथे बैठक झाली. बैठकीस राज्यभरातून सुमारे २५० प्रतिनिधी उपस्थित होते. कालच औरंगाबादेत दुसरी एक बैठक धनगर आरक्षणाला धरून झाली. ती भाजपप्रणीत बैठक होती. बैठकीचे संयोजक मंत्री राम शिंदे यांच्याशी निगडित आहेत, असा हल्ला यावेळी पांडुरंगअण्णा मेरगळ यांनी चढविला.५ आॅगस्टच्या बैठकीला राम शिंदे व महादेव जानकर या मंत्र्यांनाही आम्ही बैठकीला यायचे आमंत्रण दिले आहे. नव्हे समाज म्हणून आदेशच दिला आहे, असे मेरगळ म्हणाले.कालच्या बैठकीतील काही मागण्या अशा : २००८ पासून ते ३१ मे २०१८ पर्यंत धनगर आंदोलकांवरील केसेस त्वरित मागे घेण्यात यावेत, धनगर समाजाच्या २७ पोटजातींपैकी एक असणाऱ्या ठेलारी पोटजातीला एनटी ब मधून एनटी क मध्ये वर्ग करावे, मागच्या सरकारने समांतर आरक्षणाबाबत १३ आॅगस्ट २०१४ रोजी काढलेले परिपत्रक त्वरित रद्द करण्यात यावे आदी.

टॅग्स :reservationआरक्षणagitationआंदोलन