शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

गुरुजींना दिलासा ! नगरपरिषद, मनपा शिक्षकांची बदली आता जिल्हा परिषदेत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 12:57 IST

Nagar Parishad, Municipal teachers will now be transferred to Zilla Parishad शिक्षक सहकार संघटनेने केली होती मागणी

ठळक मुद्देएकाच जिल्ह्यातील नागरी किंवा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सेवा वर्ग करता येणार नाही.शिक्षकांना संबंधित दोन्ही नियुक्ती प्राधिकाऱ्यांची ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील.संबंधित शिक्षकाविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी सुरू नसावी अथवा फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले नसावे.

औरंगाबाद : महानगरपालिका, नगरपरिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांना जिल्हा परिषद व इतर नगरपरिषद, महानगरपालिकेमध्ये जिल्हा बदलीने जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत १६ फेब्रुवारी रोजी परिपत्रक जारी करून शासनाने दिलासा दिला आहे.

नगरपरिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाइन व्हाव्यात या मागणीसाठी शिक्षक सहकार संघटनेने अनेकदा आंदोलन केले. त्यामुळे ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाइन केल्या. दरम्यान जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना नगरपरिषद व महापालिकांमध्ये बदलीने जाता यावे यासाठीही शिक्षक सहकार संघटनेने लढा सुरू केला होता. ग्रामविकास विभागाने दिनांक २९ जून २०१७ ला शासन निर्णय काढून जिल्हा परिषद शिक्षक नगरपरिषदेमध्ये बदलीने जाऊ शकतात, असे स्पष्ट केले. 

त्यानंतर नगरपरिषद व महापालिकेच्या शिक्षकांना सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये बदलून जाता यावे किंवा त्यांची सेवा वर्ग व्हावी, अशी मागणी पुढे आली व सहकारी संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने शासनदरबारी अनेकदा निवेदने देण्यात आली. याची दखल घेत शासनाने दि. १६ फेब्रुवारी २०२१ ला परिपत्रक काढून महापालिका नगरपरिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांना जिल्हा परिषद व इतर नगरपरिषद, महापालिकेमध्ये जिल्हा बदलीने जाता येते, असे जाहीर केले. लढा यशस्वी झाला असून नवीन धोरणामुळे मनपातील शिक्षकांना जिल्हा परिषदेमध्ये येण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी सांगितले. या बदल्यासुद्धा ऑनलाइन व्हाव्यात, अशी त्यांनी मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

नवीन धोरणानुसार : १. शिक्षकांना संबंधित दोन्ही नियुक्ती प्राधिकाऱ्यांची ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील.२. मूळ नियुक्तीच्या ठिकाणी असलेली सेवा जेष्ठता बदलीच्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी गमवावी लागेल. नवीन ठिकाणी त्यांची जेष्ठता कनिष्ठ राहील.३. संबंधित शिक्षकाविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी सुरू नसावी अथवा फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले नसावे.४. शिक्षण सेवकांना बदली प्रक्रिया लागू नसेल, अपवादात्मकप्रकरणी पूर्वमान्यतेने अशी बदली करता येईल. यामध्ये महिला शिक्षण सेवकांस प्राधान्य राहील.५. एकाच जिल्ह्यातील नागरी किंवा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सेवा वर्ग करता येणार नाही. 

टॅग्स :Teacherशिक्षकTransferबदलीzp schoolजिल्हा परिषद शाळाmunicipal schoolमहापालिका शाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र