शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

‘त्या’ खुनाचे गूढ उलगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:16 IST

आपल्या वडिलांचे शेताशेजारी असलेल्या एका महिलेशी असलेले अनैतिक संबंध, त्या रखेलवर बाप करीत असलेली पैशाची उधळण, यावरुन घरात सुरु असलेले वाद, याचा राग आल्याने पोटच्या केवळ १९ वर्षीय मुलाने या ४० वर्षीय रखेलचा गळा आवळून खून केल्याची घटना तालुक्यातील मोढा बु. येथे रविवारी संध्याकाळी घडली होती. त्या खुनाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले असून याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी खून करणारा मुलगा, त्याचा मित्र व बाप अशा तीन जणांना अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : आपल्या वडिलांचे शेताशेजारी असलेल्या एका महिलेशी असलेले अनैतिक संबंध, त्या रखेलवर बाप करीत असलेली पैशाची उधळण, यावरुन घरात सुरु असलेले वाद, याचा राग आल्याने पोटच्या केवळ १९ वर्षीय मुलाने या ४० वर्षीय रखेलचा गळा आवळून खून केल्याची घटना तालुक्यातील मोढा बु. येथे रविवारी संध्याकाळी घडली होती. त्या खुनाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले असून याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी खून करणारा मुलगा, त्याचा मित्र व बाप अशा तीन जणांना अटक केली.सदर महिलेचा खून करणाºया मुलाचे नाव समाधान पंढरीनाथ ढोरमारे (१९) असे आहे. तर अनैतिक संबध असलेल्या वडिलांचे नाव पंढरीनाथ जनार्दन ढोरमारे (५४) असे आहे. यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी समाधानला मदत करणारा मित्र गोपीनाथ जनार्दन निकम (२२, सर्व रा. मोढा बु.) यालाही अटक झाली आहे. पार्वताबाई देवीदास ढोरमारे या महिलेच्या मृत्यूप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी सोमवारी प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन तपास सुरु केला होता. यात खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने नंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.दोन तासात आरोपींना अटकया खून प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा, श्वान पथक, सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून खुनाचा उलगडा केला व अवघ्या दोन तासांत तिन्ही आरोपींना अटक केली.चप्पलवरुन रहस्य उलगडलेमृतदेहाची विल्हेवाट लावताना गोपीनाथची एक चप्पल घटनास्थळी सापडली होती. श्वानपथकाने त्याचा माग काढला व गोपीनाथला ताब्यात घेताच सारे गूढ उकलले.हा खून झाला त्यावेळी पंढरीनाथ हा तिच्याच शेतातील घरात होता. १०० ते २०० फुटावर मुलाने खून केला. याचा आवाज पंढरीनाथला आला नाही का, असा प्रश्न पोलिसांना पडला असून या खुनात पंढरीनाथ तर सहभागी नाही ना, या दिशेने पोलीस तपास करीत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भुजंग, सचिन कापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोडचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप सावले, सरीता गाढे, पोलिस कर्मचारी विलास सोनवणे, विठ्ठल चव्हाण, दादाराव पवार, विठ्ठल डोके, विकास नायसे, गुन्हे शाखचे पोलीस यांनी ही यशस्वी कारवाई केली.असा केला खूनशेजारी -शेजारीच शेत असल्याने पंढरीनाथ व मयत महिलेचे सूत जमले होते. याची कल्पना पंढरीनाथच्या मुलाला होती. त्याने अनेक वेळा दोघांनाही समजावून सांगितले, पण उपयोग झाला नाही. रविवारी सकाळी सिल्लोडचा आठवडी बाजार असल्याने पंढरीनाथ या महिलेला मोटारसायकलवर घेऊन सिल्लोडला आला. तेथे बाजार करून त्याने तिला कपडे घेऊन दिले. याची कुणकुण समाधानला लागली अन् त्याने तिचा काटा काढण्याचे ठरविले.रविवारी संध्याकाळी पार्वताबाई ही खरेदी करून शेतातील घरी जात असताना समाधानने तिला शेतात अडविले व तिचा गळा आवळून खून केला. आपल्या शेतात मृतदेह बघून पोलीस संशय घेतील म्हणून समाधानने मित्र गोपीनाथला शेतात बोलावले व घटना सांगितली व मृताची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करण्याचे सांगितले. त्याने आधी नकार दिला, नंतर मैत्रीखातर त्याने बाजूच्या भुजंगराव यांच्या शेतात असलेल्या विहिरीपर्यंत मृतदेह ओढत नेला व तो विहिरीत टाकणार तेवढ्यात कुणाच्या तरी पावलांचा आवाज आल्याने ते दोघे मृतदेह सोडून पळून गेले. चाणाक्ष पोलिसांनी हा गुन्हा अवघ्या दोन तासात उघड केला.