नगरपालिकेतर्फे परिसर स्वच्छता, निसर्गाशी संबंधित पृथ्वी, जल, वायू, अग्नी,
आकाश या पंच तत्वावर आधारित पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन, संगोपन करण्यासाठी व माझी वसुंधरा स्वच्छ, सुंदर, हरित पर्यावरण पूरक ठेवण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने वृक्षारोपण, स्वच्छता, प्लास्टिक निर्मूलनसाठी अधिक प्रयत्न करण्यात येत आहे. यावेळी स्वच्छता विभाग निरीक्षक प्रमोद निकाळे, रमेश त्रिभुवन, कैलास त्रिभुवन, संतोष त्रिभुवन आदी प्रयत्नशील आहे.