शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

मायबाप सरकार ! मराठवाड्याला काय देणार? असे असू शकते ४० हजार कोटींचे अपेक्षित ‘पॅकेज’...

By यदू जोशी | Updated: September 16, 2023 11:35 IST

केवळ घोषणा नको, निधी द्या; संभाजीनगरात आज मंत्रिमंडळाची बैठक; संभाव्य निर्णय ‘लोकमत’च्या हाती

छत्रपती संभाजीनगर/मुंबई : तब्बल सात वर्षांनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. मराठवाड्याला या बैठकीच्या निमित्ताने काय काय द्यायचे, यावर गेले आठ दिवस मंत्रालयात सरकारी पातळीवर मोठे चिंतन-मंथन झाले. मंत्री कार्यालयाकडून आणि सचिवांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आणि त्यातून सुमारे चाळीस हजार कोटींचे एक पॅकेज तयार करण्यात आले आहे. त्यातील संभाव्य घोषणांचा महत्त्वाचा तपशील ‘लोकमत’च्या हाती लागला आहे. मराठवाड्यासाठी केवळ घोषणांचा पाऊस न पाडता, विकासाचा कालबद्ध कार्यक्रम आखून त्यासाठी भरीव निधीची तरतूद करावी, अशी मराठवाड्यातील जनतेची अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सरकार मराठवाड्याला हजारो कोटी रुपयांचे पॅकेज देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. शनिवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय होतात, याकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागून आहे.

अपेक्षित निर्णय- संत ज्ञानेश्वर उद्यान पैठण विकसित करणे (१५० कोटी)- शनी देवगाव उच्च पातळी बंधारा (२८५ कोटी)- पश्चिम वाहिनीद्वारे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वाळविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प (१४०४० कोटी)- तुळजाभवानी मंदिर विकास (१३२८ कोटी)- श्रीक्षेत्र औंढा नागनाथ या तीर्थक्षेत्राचा विकास - (६० कोटी)- श्री साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा पाथरी, जि. परभणी (९१.८० कोटी.)- श्री मुर्डेश्वर महादेव मंदिर देवस्थान, केळगाव, ता. सिल्लोड (४५ कोटी)

- ----------------------- मराठवाड्यात बांधणार ३४३९ अंगणवाड्या- औरंगाबाद विभागात ४७२४ अंगणवाड्यांपैकी ३४३९ अंगणवाड्या बांधण्यासाठी जागा उपलब्ध आहे.त्यामुळे ठिकाणी जिल्हा वार्षिक योजनेतून तसेच मानव विकास कार्यक्रमातून अंगणवाड्यांसाठी इमारती बांधण्यात येतील त्यावर तीन वर्षात ३८६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.-----------------------------दगडाबाईंचे स्मारकमराठवाडा मुक्तिसंग्रामात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई असा लौकिक असलेल्या दिवंगत दगडाबाई शेळके यांचे स्मारक त्यांच्या मूळ गावी म्हणजे धोपटेश्वर, ता. बदनापूर येथे उभारण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रांगणात हे स्मारक उभारले जाईल आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेत या शाळेचा समावेश करण्यात येईल, त्यावर पाच कोटी रुपये खर्च करण्यात येतील.----------------------------कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयबीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर-कासार, आंबेजोगाई, केज, परळी, माजलगाव आणि बीड या आठ तालुक्यांमध्ये १६०० मुलींसाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय उभारण्यात येतील. त्यावर ८० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.------------------------क्रीडा विद्यापीठासाठी समितीछत्रपती संभाजीनगर येथे क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल अशी शक्यता आहे. या विद्यापीठाच्या उभारणीसाठी ६५६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. परभणी जिल्हा क्रीडासंकुलाचे अद्ययावतीकरण परळी येथे तालुका क्रीडासंकुल उभारणे, जळकोट (ता. उदगीर) येथे तालुका क्रीडासंकुल उभारणे यावर २५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.------------------------३२२५ कोटींची धवलक्रांतीमराठवाड्यात दूध उत्पादनाला वेग देण्यासाठी ३२२५ कोटी रुपयांची योजना प्रस्तावित आहे. मराठवाड्यातील आठ हजार सहाशे गावांचा समावेश करण्यात येईल. वैयक्तिक बचत गट शेतकरी उत्पादक कंपनी किमान पाच व कमाल १० दुधाळ जनावरांचे वाटप केले जाईल. एका गावात किमान ५० दुधाळ जनावरांचे अनुदान तत्त्वावर वाटप करण्यात येणार आहे.----------------------फर्दापूर : छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत दहा एकर जागेत उभारण्यात येईल. त्यावर ५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.------------------------सांस्कृतिक कार्य विभाग काय देणार?-छत्रपती संभाजीनगर शहरातील पाच स्मारके १५ कोटी- अंबाजोगाई मंदिर समूह ३० कोटी-- संगमेश्वर मंदिर; पाटोदा ७ कोटी- तेर मंदिर व पुरातत्त्वीय स्थळ समूह विकास - २० कोटी.- महादेव मंदिर माणकेश्वर - ११ कोटी- - महालक्ष्मी मंदिर व बारावा जागजी ता., जिल्हा धाराशिव - १५ कोटी- होट्टल मंदिर समूह - ४० कोटी- योग नृसिंह व भोग नृसिंह राहील तालुका नायगाव - ४०कोटीचारठाणा मंदिर समूह, परभणी - ६० कोटी- गुप्तेश्वर मंदिर, धारासुर, तालुका खेड -१५ कोटी.- परळी वैजनाथ मंदिर आराखडा - १५३ कोटी- ------------------------ कुरुंदा, ता. वसमत जिल्. हिंगोली येथे पूर प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर ३३ कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव आहे. मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांमधील प्रादेशिक आपत्ती प्रतिसाद केंद्र व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व प्रतिसाद केंद्राचे बळकटीकरण आणि आधुनिकीकरण करण्यासाठी ५५.६९ कोटी रुपये खर्च करणे प्रस्तावित आहे.- ------------------------- आष्टी येथे कृषी औद्योगिक क्षेत्र उभारण्यासाठी २४९ कोटी.- ---------------------- रस्त्यांसाठी १२ हजार कोटी- मराठवाड्यातील १०३० किलोमीटर लांबीच्या ३१ रस्त्यांची सुधारणा टप्प्याटप्प्याने करण्यात येईल. त्यासाठी १०३०० कोटी रुपये खर्च करण्याची योजना आहे.- नांदेड गोदावरी घाट हा साबरमती नदीच्या धर्तीवर रिव्हर फ्रंट म्हणून विकसित केला जाईल त्यावर १०० कोटी रुपये खर्च करण्याचे प्रस्तावित आहे.- आशियाई विकास बँकेच्या अर्थसाहाय्यातून राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाच्या टप्पा तीनमध्ये मराठवाड्यातील ३०० कि.मी. लांबीच्या रस्त्यांची सुधारणा टप्प्याटप्प्याने केली जाईल. त्यावर २४०० कोटी रुपये खर्च करण्यात येतील.- --------------------------- मराठवाड्यातील ६०० ग्रामपंचायतींच्या इमारती बांधण्याकरता तीन वर्षांत १८० कोटी रुपये खर्च करण्याची योजना आहे.- नांदेड शहरात सीसीटीव्ही बसवण्याकरता १०० कोटी- छत्रपती संभाजीनगर येथील सेंट्रल बसस्टँड व शहागंज येथील बसस्थानकाचे बीओटी तत्त्वावर बांधकाम - ३२९ कोटी- छत्रपती संभाजीनगर विभागासाठी एकूण ११९७ ई बस उपलब्ध करून देणे - ४२१ कोटी- छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत वाहन निरीक्षण व परीक्षण केंद्र यांची उभारणी १३५ कोटी.- पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या २२८ किलोमीटर मार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम बसविणे - १८८ कोटी.- मराठवाड्यातील ग्रामपंचायतींना इंटरनेट जोडणी देणे - २८४ कोटी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा