शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

औरंगाबादेत मुस्लिम महिलांचा उद्या महामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:04 IST

मुस्लिम बांधवांच्या ‘शरियत’मध्ये होत असलेल्या हस्तक्षेपाच्या विरोधात शुक्रवार, दि.२३ मार्च रोजी दुपारी ३ वाजता आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयावर महिलांचा महामोर्चा काढण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे‘शरियत’मध्ये हस्तक्षेप : विविध संस्था, संघटनांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुस्लिम बांधवांच्या ‘शरियत’मध्ये होत असलेल्या हस्तक्षेपाच्या विरोधात शुक्रवार, दि.२३ मार्च रोजी दुपारी ३ वाजता आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयावर महिलांचा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात हजारोंच्या संख्येने महिलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सूचनेनुसार हा मोर्चा काढण्यात येत आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत यशस्वी मोर्चांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारच्या मोर्चात विविध संस्था, संघटनांसह सर्वसामान्य महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.तीन तलाक विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार असून, बुधवारी संयोजकांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मोर्चाच्या समन्वयक फहीम-उन्न-निसाबेगम यांनी सांगितले की, शुक्रवारच्या विशेष नमाजनंतर मोर्चाला सुरुवात होणार आहे. दुपारी ३ वाजता आमखास मैदानाहून मोर्चाला सुरुवात होईल. विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चाचा समारोप करण्यात येणार आहे. मोर्चा काढण्यासाठी मागील काही दिवसांपासून जोरदार तयारी करण्यात येत आहे. वॉर्डनिहाय बैठका, प्रत्येक घरी जाऊन महिलांमध्ये जागृती करण्यात येत आहे.फहीम-उन्-निसाबेगम यांनी नमूद केले की, तीन तलाकला समोर ठेवून शरियतमध्ये हस्तक्षेप होत आहे. मुस्लिम समाज आणि महिलांना हे कदापि मान्य नाही. मुस्लिम महिलांबद्दल केंद्र शासनाला एवढी आपुलकी असेल, तर त्यांनी शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्यावे. या देशात तीन तलाकशिवायही अनेक गंभीर समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. बेरोजगारी, दारू यासंदर्भात ठोस पावले उचलावेत.

टॅग्स :Muslimमुस्लीमWomenमहिलाAurangabadऔरंगाबाद