शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

प्रजासत्ताक दिनी रंगणार औरंगाबादमध्ये मुशायर्‍याची मैफल; देशभरातील १२ नामांकित शायर होणार सहभागी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 13:32 IST

देशभरातील आघाडीचे १२ शायर मुशायर्‍यांमध्ये आपली अवीट शायरी पेश करणार आहेत. डॉ. रफिक झकेरिया कॅम्पसमधील नवल टाटा स्टेडियममध्ये २६ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता मुशायर्‍यास सुरुवात होईल. लोकमत, लोकमत समाचार आणि लोकमत टाइम्स या मैफलीचे प्रायोजक आहेत.

ठळक मुद्देउर्दू, गझल आणि शायरीवर निर्व्याज प्रेम करणार्‍या औरंगाबादकरांसाठी यंदाचा प्रजासत्ताक दिन अत्यंत वेगळा आणि विशेष ठरणार आहे. देशभरातील आघाडीचे १२ शायर मुशायर्‍यांमध्ये आपली अवीट शायरी पेश करणार आहेत.

औरंगाबाद : उर्दू, गझल आणि शायरीवर निर्व्याज प्रेम करणार्‍या औरंगाबादकरांसाठी यंदाचा प्रजासत्ताक दिन अत्यंत वेगळा आणि विशेष ठरणार आहे. त्याचे कारणही तेवढेच खास आहे आणि ते म्हणजे आपल्या शहरात होत असलेला ‘अखिल भारतीय मुशायरा’ हा दर्जेदार कार्यक्रम उम्मीद कल्चर फाऊं डेशनतर्फे या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील आघाडीचे १२ शायर मुशायर्‍यांमध्ये आपली अवीट शायरी पेश करणार आहेत. डॉ. रफिक झकेरिया कॅम्पसमधील नवल टाटा स्टेडियममध्ये २६ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता मुशायर्‍यास सुरुवात होईल. लोकमत, लोकमत समाचार आणि लोकमत टाइम्स या मैफलीचे प्रायोजक आहेत.

डॉ. इर्तेकाज अफजल खान यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या मुशायर्‍यांमध्ये रसिकांना राहत इंदोरी, ताहिर फराज, शकील आझमी, शबिना अदीब, मदन मोहन दानिश, इब्राहिम अश्क, अब्रार काशिफ, शरफ नानपर्वी, सलीम मोहीउद्दीन, वाहेद पाशा, झिया तोनकी, साबेर बासमती, कमर एजाज असे एकाहून एक उर्दू शायरीमधील रत्न ऐकायला मिळणार आहेत. प्रत्येकाची आपली एक खास खुबी, आपली एक खास शैली आहे. प्रत्येक नाव रसिकांच्या तोंडून ‘वाह!’ आणि त्यांच्या मनाचा ठाव घेणारे आहे.

औरंगाबादकरांना शायरीचे नेहमीच मोठे आकर्षण राहिले आहे. येथे अनेक दिग्गज शायर होऊन गेले. त्यामुळे या मातीत शायरीला आपलेसे करण्याची, इथल्या रसिकांना शायरीच्या दुनियेत रमण्याची मोठी परंपरा आहे. अशाच चोखंदळ रसिकांच्या कलाप्रेमाला साद घालण्यासाठी हा देशपातळीवर चर्चिला जाणारा शायरी महोत्सव भरविण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या आयोजन समितीमध्ये उम्मीद कल्चरल फाऊं डेशनचे अध्यक्ष मंझूर खान मसूद, शोएब खुसरो, शारेक नक्शबंदी, अशरफ मोतीवाला, डॉ. शोएब हाश्मी, झकिउद्दीन सिद्दिकी (मश्शू), अयाज सिद्दिकी, एजाज खान अब्बास, डॉ. मकदुम फारुकी, ख्वाजा शबुद्दीन, डॉ. सईद फैसल, अब्दुल गफर खान, सोहेल झकिउद्दीन, अल्ताफ शेख, असिफ खान इस्माईल, मोहसिन खान, ख्वाजा निझामुद्दीन, शाहेद बेग, हरिस सिद्दिकी, सिराजुद्दीन सिद्दिकी, डॉ. सईद आतिफ, एजाज नेहरी, झहीर सिद्दिकी, सरताज पठाण, रफिक अहमद खान, सईद खान बाबा, अशफाक अहमद सिद्दिकी, अझहर खान मसूद, डॉ. अल्ताफ सिद्दीक आणि मुबीन सिद्दिकी यांचा समावेश आहे. उर्दू शायरीमधील नामांकित शायरांना ऐकण्याची, उर्दू वाणीची ‘लजीज’ चव चाखण्यासाठी शहरातील तमाम रसिकप्रेमींनी मुशायर्‍याला उपस्थित राहण्याचे आयोजकांनी आवाहन केले आहे.

आॅल इंडिया मुशायरा : २६ जानेवारीवेळ : सायंकाळी ७ वाजता.ठिकाण : नवल टाटा स्टेडियम, डॉ. रफिक झकेरिया कॅम्पस, रोजाबाग, औरंगाबाद.