शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
5
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
6
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
7
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
8
संपादकीय: चोंडीचा ‘राजकीय’ घाट
9
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
10
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
11
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
12
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
13
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
14
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
15
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
16
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
17
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
18
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
19
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
20
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना

गुंजोटीतील पुतळा प्रशासनाने हटविला

By admin | Updated: January 15, 2017 01:07 IST

उमरगा/गुंजोटी : उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील शिवाजी चौकात शुक्रवारी मध्यरात्री विना परवाना बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकृती पुतळा शनिवारी सायंकाळी पोलीस, महसूल प्रशासनाने हटविला़

उमरगा/गुंजोटी : उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील शिवाजी चौकात शुक्रवारी मध्यरात्री विना परवाना बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकृती पुतळा शनिवारी सायंकाळी पोलीस, महसूल प्रशासनाने हटविला़ या प्रकारामुळे गुंजोटीत काही काळ तणाव निर्माण झाला होता़ प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर वातावरण निवळले असले तरी रात्री उशिरापर्यंत तणावपूर्ण शांतता कायम होती़ दरम्यान, याच्या निषेधार्थ उमरगा शहरातील चौकात रास्ता रोको करण्यात आला़गुंजोटी येथील शिवाजी चौकात शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात इसमांनी विना परवाना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविला होता़ शनिवारी सकाळी ही माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर फौजफाट्यासह महसूल प्रशासन गावात दाखल झाले़ या घटनेच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी गुंजोटी ग्रामपंचायतीत बैठक झाली़ या बैठकीसाठी तहसीलदार अरविंद बोळंगे, उपविभागीय पोलीस अधिकारी खांडवी, पोलीस उपनिरीक्षक बी.बी.वडदे, उपनिरीक्षक डी. व्ही. सिद्दे, विलास गोबाडे, विस्ताराधिकारी पी. एफ. चव्हाण, पोलीस पाटील नाजेर देशमुख आदी उपस्थित होते. शिवसेनेचे किरण गायकवाड, तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, भाजप हर्षवर्धन चालुक्य, एम. ए. सुलतान, सरपंच शंकरराव पाटील, उपसरपंच शिवाजीराव गायकवाड, नगरसेवक संजय पवार, उमाकांत माने आदींनी ग्रामपंचायत कार्यालयात चर्चा केली. यादरम्यान गावात काही काळ तणावपूर्ण शांतता होती. दुपारी ३ ते ३.३० पर्यंत पोलीस बंदोबस्त असला तरी प्रशासनाने कार्यवाहीसंदर्भात कोणताच थांगपत्ता लागू दिला नाही़ मकरसंक्रांतीचा सण असल्याने दिवसभर कारवाई करण्यात आली नाही़ सायंकाळच्या सुमारास अचानक दंगल नियंत्रण पथकासोबत उपविभागीय जिल्हाधिकारी निलेश श्रींगी, पोलीस उपविभागीय अधिकारी खांडवीसह अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह गावात दाखल झाले. प्रशासनाने पंचांसमक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काढून ग्रामपंचायत कार्यालयात नेऊन ठेवण्यात आला़ दरम्यान, घटनेनंतर गुंजोटी गावात शांतता रहावी, यासाठी विश्वनाथ देशमुख, दिलीप शहा, राजेंद्र गायकवाड, मोहोद्दीन काझी, अयुब मुजावर, अमर नाईकवाडे, सुधीर हिरवे, बसवराज टोंपे, किसन पाटील आदी ग्रामस्थांनी प्रशासनासोबत प्रयत्न केले़ (वार्ताहर)