शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गुटखा पुडी न दिल्याने तरूणाचा खून; दोन जणांना गुन्हेशाखेकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 18:27 IST

आरोपींनी मृतदेह गोगाबाबा टेकडी परिसरात फेकून दिला होता.

ठळक मुद्देया प्रकरणातील अन्य एकाचा शोध सुरु आहे

औरंगाबाद: नवविवाहित तरूणाच्या खूनाचा उलगडा करण्यात गुन्हेशाखेला गुरूवारी यश आले. गुटखा पुडी न दिल्याने तडीपार गुंडाने साथीदारांच्या मदतीने निर्जनस्थळी नेऊन बेदम मारहाण करीत गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. नंतर आरोपींनी मृतदेह गोगाबाबा टेकडी परिसरात फेकून दिला होता. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून अन्य एकाचा शोध सुरू आहे.

तडीपार गुंड प्रवीण उर्फ बाली  भास्कर भालेराव (२६,) आणि प्रशांत सुरेश साळवे (२३, दोघे रा. रा. जयभीमनगर, टाऊन हॉल परिसर)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरिापीचा तिसरा साथीदार सोमेश अहिरे हा पसार असून त्याचा शोध सुरू आहे. गोगाबाबा टेकडी परिसरात१८ सप्टेंबर रोजी सकाळी शफीकखान रफिक खान (रा. अरब खिडकी, बेगमपुरा)याचा गळा आवळून खून करून मृतदेह फेकल्याचे आढळले होते. 

याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. घटनास्थळीही कोणताही पुरावा गुन्हेगारांनी सोडला नव्हता. गुन्हेशाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक विजय जाधव, पोलीस कर्मचारी दीपक ढोणे, शिवा बोर्डे, रमेश भालेराव, सुरेश काळवणे, संदीप बिडकर आणि नितीन धुळे यांच्या पथकाला या खूनात जयभीमनगर येथील तडीपार गुंड बाली उर्फ प्रवीण असल्याची माहिती खबऱ्याने  दिली. बाली हा शहरातून तडीपार  असताना तो  १८ रोजी शहरात आल्याचे निष्पन्न झाले. मात्र तो पोलिसांना सापडत नव्हता, बुधवारी रात्री त्याला पोलिसांनी एका ठिकाणाहून उचलले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

असा केला खून

टाऊन हॉल येथील पानटपरीवर गुटखा खाण्यासाठी शफीक आला होता. गुटखा घेऊन तो एका प्रार्थनास्थळाजवळ उभा असताना आरोपी बाली, त्याचे साथीदार प्रशांत आणि सोमेश यांनी त्याला गाठले आणि गुटखा मागितला. शफिकने त्यांना गुटखा देण्यास नकार दिला. याचा प्रचंड राग बाली आणि त्याच्या साथीदारांना आला. त्यांनी शफीकला शिवीगाळ करीत बळजबरीने दुचाकीवर बसविले. एकाच दुचाकीवर चार जण बसून ते घाटी रुग्णालय कॅम्पसमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ घेऊन गेले.  तेथे त्यांनी शफिकला मारहाण केली. यावेळी शफिकने आरडाओरड केल्याने रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी येथे भांडण करू नका,असे म्हणाल्याने आरोपींनी त्याला पुन्हा दुचाकीवर बसविले आणि ते त्याला विद्यापीठाकडे नेऊ लागले. दुचाकीवर बसल्यानंतर शफिक ओरडू लागल्याने आरोपींनी चालत्या दुचाकीवर त्याचा गळा आवळून त्याचा खून केला.नंतर मृतदेह गोगाबाबा टेकडीजवळ फेकून आरोपी पसार झाले होते.