शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व वैमनस्यातून मित्रानेच केला वसुली एजंटचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 16:20 IST

आपसातील वैमनस्य आणि अनैतिक संबंधातून खून

ठळक मुद्देसंशयिताला पुण्यातील कुरकुंभ येथून अटक पाच दिवस पोलीस पथक होते पुण्यात 

औरंगाबाद : खाजगी बँकेचा वसुली एजंट मंटुसकुमार सिंग ऊर्फ माँटिसिंग अनिलकुमार (रा. पीस होम सोसायटी, मिटमिटा) याचा खून करून फरार झालेल्या त्याच्या मित्राला छावणी पोलिसांनी दौंड (पुणे) येथील कुरकुंभ येथे पकडले. आपसातील वैमनस्य आणि अनैतिक संबंधातून हा खून करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी दिली.

कपिल राजीव रापते (२५, रा. बीड बायपास परिसर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलीस उपायुक्त म्हणाले मंटुसकुमार सिंग ऊर्फ माँटीसिंग ची १९ ऑक्टोबरच्या रात्री त्याच्या मिटमिटा येथील फ्लॅटमध्ये भोसकून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर मारेकरी फ्लॅटला लॅच लॉक करून पसार झाला होता.  २१ रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मयताचा मित्र विशाल मदन दामोदर (रा. पडेगाव) याने छावणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. मृताचे एका तरुणीसोबत अनैतिक संबंध होते. त्याच तरुणीचे आरोपीसोबतही संबंध होते. तिच्यावरून माँटिसिंगसोबत त्याचा वाद होता. यातून त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाले होते. 

घटनेच्या काही दिवसांपूर्वी मृताने त्यांच्यासोबत राहणाऱ्या तरुणीला मारहाण केली होती. ही बाब आरोपी कपिलला तिने सांगितली होती. तेव्हा त्यामुळे त्यांच्यात पुन्हा भांडण झाले असता माँटिसिंगने त्याला शिवीगाळ केली होती. याचा कपिलला राग आला होता. १८ रोजी रात्री कपिल मिटमिटा रोडवरील एका ढाब्यावर जेवायला गेला होता. तेथून जेवण आटोपून तो माँटीसिंगच्या घरी गेला आणि त्याने त्याचा खून केला. यानंतर फ्लॅटला कुलूप लावून तो पसार झाला होता. आरोपी पुण्याला असल्याचे समजताच तो दुबईला पळून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केली होती.

पाच दिवस पोलीस पथक होते पुण्यात पुण्यात एका वाटसरूचा मोबाईल घेऊन त्याने बहिणीला फोन केला होता. यामुळे तो पुण्यात असल्याचे समजल्याने  सहायक आयुक्त विवेक सराफ, निरीक्षक मनोज पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन वायाळ, हवालदार नागरगोजे, शिंदे, चिंधाळे, थोरात आणि पायघण यांचे पथक पाच दिवसांपासून पुण्यात त्याचा शोध घेत होते. पुण्यातील ताठेवाडी, पिंपरी चिंचवड आदी ठिकाणी त्याचे छायाचित्र घेऊन पोलीस त्याला शोधत होते. मंगळवारी अखेर तो कुरकुंभ येथे पोलिसांच्या हाती लागला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद