शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'मुलीची आत्महत्या नव्हे घातपात'; तपासाला वेग देण्याच्या ग्वाहीनंतर पालकांनी स्वीकारला मृतदेह

By योगेश पायघन | Updated: August 27, 2022 17:51 IST

देवगिरी काॅलेज विद्यार्थीनी आत्महत्या प्रकरण, भावाने सांगितले तिला तिला हॉस्टेलवर त्रास होता

औरंगाबाद: देवगीरी महाविद्यालयातील मुलींच्या वसतीगृहात आरती सर्जेराव कोल्हे (२०, रा. गुरुपींप्री, ता. घनसावंगी, जि. जालना) या बी काॅमच्या विद्यार्थीनीने आत्महत्या केली. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. वेदांतनगर पोलीसांनी जलद तपासाची ग्वाही दिल्यावर अखेर दुपारी तीन वाजेच्या सुमारास पालकांनी मृतदेह स्विकारून गावाकडे अंत्यसंस्कारासाठी रवाना झाले.

देवगिरी महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात तिसऱ्या मजल्यावर रूम नंबर ४४ मध्ये शुक्रवारी घडलेल्या घटनेसंदर्भात आरतीचा भाऊ गणेश कोल्हे म्हणाला, पोळ्याला पुण्याहून आरतीला भेटीसाठी आलो होतो. आज गावाहून येवून औरंगाबादला तिला भेटणार होतो. मात्र, शेवटची भेट अशी झाली. आरतीच्या रूममधील एका मुलीची तक्रार तीने वाॅर्डनकडे केल्याचे २ दिवसांपुर्वी सांगितले होते. त्या तक्रारीचे काय झाले. देवगिरी महाविद्यालय, वसतीगृह का सहकार्य करत नाहीये, असा सवाल त्याने उपस्थित केला. तसेच आरतीच्या चिठ्ठीवरील मजकूराच्या हस्ताक्षराबद्दल संशय असून त्याचाही तपास व्हावा, अशी मागणी भावाने केली. 

वडील सर्जेराव कोल्हे यांनी आरतीची आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करून सखोल तपास करून सत्य बाहेर आणण्याची मागणी केली. वेदांतनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक व तपास अधिकारी सचिन सावंत म्हणाले, आरतीने कोणत्या कारणाने आत्महत्या केली. त्या दृष्टीने तांत्रीक दृष्टीने तपास करत आहोत. नातेवाईकांनाही तपासाला वेळ द्या. असे म्हणून त्यांची समजूत काढल्याने ते मृतदेह ताब्यात घेण्यास तयार झाले आहेत.

तोपर्यंत स्विकारण्यास दिला नकार...कुटुंबिय व नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर घातपाताचा संशय व्यक्त करून गुन्हा नोंदवेपर्यंत मृतदेह न स्विकारण्याची भूमिका घेतली. पोलीसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पथकही घाटीत पोहचले. नातेवाईकांनी वेदांतनगर पोलीस ठाणे गाठून देवगिरी महाविद्यालयासमोर ठिय्या देण्याचा आग्रह धरला. पोलीसांनी सखोल तपासाची ग्वाही दिल्यावर मृतदेह स्विकारून कुटुंबिय व नातेवाईक गावी परतले. शोककळा पसरलेल्या गुरूपींप्री येथे आरतीच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी