शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व वैमनस्यातून माजी उपसरपंचाचा खून; अवघ्या काही तासात गावातीलच तीन तरुण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 19:44 IST

गाढेगाव पैठणचे माजी उपसरपंच कांताराव श्रीपत शिंदे ( ४८) यांचा मृतदेह आज सकाळी त्यांच्याच शेतवस्तीवरील घरापासून काही अंतरावर आढळून आला.

पैठण : गाढेगाव पैठणचे माजी उपसरपंच असलेले कांताराव शिंदे यांचा मृतदेह सोमवारी सकाळी घरापासून काही अंतरावर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. पोलीस तपासात पूर्व वैमनस्य आणि शेतीच्या वादातून शिंदे यांचा खुन केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत अवघ्या काही तासात गावातील तीन आरोपींना अटक केली आहे. 

या बाबत अधिक माहिती अशी की, गाढेगाव पैठणचे माजी उपसरपंच कांताराव श्रीपत शिंदे ( ४८) यांचा मृतदेह आज सकाळी त्यांच्याच शेतवस्तीवरील घरापासून काही अंतरावर आढळून आला.  मृतदेहावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. घटना समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे, बीडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने, पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील, प्रशांत मुंढे, ठसे तज्ञ अमोल पवार, पोलीस नाईक हरिश्चंद्र मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे व त्यांचे पथकही घटनास्थळी हजर झाले.

कांतराव शिंदे हे रविवारी घराबाहेर पडले होते. कधीकधी ते रात्री उशिरापर्यंत घरी येत नसल्याने उशीरा येतील म्हणून घरातील सर्वजण झोपी गेले. रात्री शिंदे घरी आले नाही म्हणून त्यांचा मुलगा लखन शोधण्यासाठी सोमवारी सकाळी घराबाहेर पडला. यावेळी वाळुज एमआयडीसी रोडवर शिंदे यांचा मृतदेह आढळून आला. शिंदे यांना जबर मारहाण केल्याचे आढळून आले. त्यांच्या नाकातून रक्तस्राव झालेला होता तर सर्वांगावर मारहाणीचे वळ उमटलेले होते. मृतदेहाजवळ एक लाकडी दांडा, कमरेच्या पट्ट्याचे क्लिप आदी आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्याने शिंदे यांचा खुन करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.

पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस या बाबत तपास करण्याचे आदेश दिले. अवघ्या काही तासात या प्रकरणाचा  छडा लावत  अनिल उर्फ पप्पू अशोक केदारे  (२१),  संजय मनोहर केदारे  (२६), राजेश प्रभाकर केदारे ( २३)  रा. गाढेगांव ता . पैठण यांना परिसरातील एका शेतातून ताब्यात घेतले. रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास म्हसोबा पुलाजवळ शिंदे यांना बेल्ट आणि लाकड़ाने मारहाण करुन  खुन केल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांनी सांगितले.ही कारवाई पोलीस निरीक्षक भागवत फुंदे , पोलीस उपनिरिक्षक संदीप सोळंके , गणेश राऊत, पोहेकों प्रमोद खांडेभराड , किरण गोरे , विक्रम देशमुख , श्रीमंत भालेराव , धिरज जाधव , पोना नरेंद्र खंदारे , संजय भोसले , वाल्मीक निकम , उमेश बकले ,  ज्ञानेश्वर मेटे , योगेश तरमाळे , संतोष डमाळे यांनी केली आहे .

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी