शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील रस्त्याच्या वादातून वृद्ध शेतकऱ्याचा खून; दोघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 12:06 IST

घारदोन शिवारातील गट क्रमांक ७८ मध्ये माणिकराव नवपुते यांची शेती आहे.

ठळक मुद्देया प्रकरणी दोन आरोपी अटकेत घारदोन येथील शनिवारी रात्रीची घटना

औरंगाबाद : शेतात जाणाऱ्या रस्त्यावरून ट्रॅक्टर नेल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी घरात शिरून ६५ वर्षीय माणिकराव नवपुते या वृद्ध शेतकऱ्याचा खून केल्याची घटना शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घारदोन शिवारात घडली. चिकलठाणा पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

घारदोन शिवारातील गट क्रमांक ७८ मध्ये माणिकराव नवपुते यांची शेती आहे. बाजूला त्यांचा पुतण्या श्रीराम जनार्दन नवपुते व भास्कर भुजंगराव नवपुते यांचे शेत आहे. माणिकराव नवपुते यांना शेतात जाण्यासाठी श्रीराम व भास्कर यांच्या शेतातून रस्ता आहे. माणिकराव नवपुते यांचा थोरला मुलगा गोरख याने शेतात सरकी लावण्यासाठी ट्रॅक्टर आणले होते. त्याला शेतातील रस्त्यावरून जाण्यास श्रीराम व भास्करने मज्जाव केला. श्रीरामचा मुलगा रवी याने ट्रॅक्टरचालक गोरख यास शिवीगाळ केली. दरम्यान, रात्री आठ वाजेच्या सुमारास श्रीराम नवपुते, भास्कर नवपुते, रवी श्रीराम नवपूते, बद्रीनाथ जनार्दन नवपूते, अमोल बद्री नवपुते, हरी बाबूराव नवपुते, राम बाबूराव नवपुते, बापू भुजंगराव नवपुते, शोभाबाई श्रीराम नवपुते, मंगल बद्रीनाथ नवपुते, नंदा भास्कर नवपुते, मंगल बाबूराव नवपुते यांनी घरात शिरून माणिक व त्यांचा धाकटा मुलगा विक्रम यांना शिवीगाळ करत बैलगाडीच्या लोखंडी शिवळने (गज) मारहाणीला सुरुवात केली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या माणिक यांचा थोरला मुलगा गोरख, सून वर्षा त्यांनादेखील जमावाने मारहाण केली.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल साहेब, सहायक निरीक्षक विश्वास पाटील, फौजदार प्रदीप ठुबे, अंमलदार करंगळे, शिंदे, देशमुख, टीमकीकर, डकले आदींनी घारदोनकडे धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी श्रीराम नवपुते आणि भास्कर नवपुते यांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील हे तपास करीत आहेत.

लोखंडी शिवळने केले प्रहारघरासमोर जमलेला जमाव पाहून माणिकराव नवपुते हे घरातून बाहेर आले. तेव्हा संतप्त जमावाने त्यांच्या डोक्यात व कपाळावर लोखंडी शिवळने प्रहार केले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. नातेवाइकांनी त्यांना तत्काळ जखमी अवस्थेत घाटीत दाखल नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेत त्यांचा मोठा मुलगा गोरख व विक्रम हेदेखील गंभीर जखमी झाले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद