शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

'मोबाईल हिसकावल्याने घातला डोक्यात दगड'; अट्टल गुन्हेगाराच्या खून प्रकरणात अल्पवयीन मुलासह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 11:58 IST

कायमची कटकट संपविण्याच्या हेतूने यातील एकाने त्याच्या डोक्यात दगड मारला. दगडाचा प्रहार लागताच शेख माजीद हा जागीच निपचीत पडला

ठळक मुद्देघटना डोळ्याने प्रत्यक्ष पाहिलेल्या अल्पवयीन आरोपीने हा प्रकार त्याच्या नातेवाईकांना सांगितला. त्यामुळे हे बिंग फुटले.

औरंगाबाद : बारापुल्ला गेटजवळील खाम नदीत शेख माजीद या गुन्हेगाराचा खून करणाऱ्या तीन आरोपींना छावणी पोलिसांनी रविवारी अटक केली. यात एक आरोपी अल्पवयीन आहे. 

अरबाज वाहेद खान (१९, रा. कोहिनूर कॉलनी), फळ विक्रेता मोहमद मुस्तफा उर्फ परवेज अब्दुल समद (२०, रा. कोतवालपुरा) अशी आरोपींची नावे असून, तिसरा आरोपी अल्पवयीन आहे. हे तिघेजण शुक्रवारी रात्री कोतवालपुरा भागात रिक्षात बसून मोबाईलवर गेम खेळत होते. तेव्हा पहाटे तीन- साडेतीनच्या सुमारास नशेत तर्रर्र होऊन शेख माजीद हा तिथे गेला व मोबाईलवर गेम खेळत बसलेल्या तरुणांच्या गळ्यावर चाकू ठेवून पैशांची मागणी करू लागला. लवकर पैसे देत नसल्यामुळे माजीदने त्यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. राग अनावर झाल्यामुळे त्या तिघांनी त्याला गोड बोलून खामनदीजवळ नेले व त्याला बेदम चोप दिला. तेव्हा माजीद त्यांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी पळत सुटला व पाय घसरून तो खाम नदीत कोसळला. त्याला पकडण्याच्या नादात त्याच्या अंगातील शर्ट फाटून आरोपींच्या हातात आला. त्यानंतर कायमची कटकट संपविण्याच्या हेतूने यातील एकाने त्याच्या डोक्यात दगड मारला. दगडाचा प्रहार लागताच शेख माजीद हा जागीच निपचीत पडला, अशी कबुली मारेकऱ्यांनी पोलीस तपासात दिली.

छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज पगारे यांच्या पथकातील उपनिरीक्षक सचिन वायाळ यांनी तपासाची चक्रे गतिमान केली. तत्पूर्वी, ही घटना डोळ्याने प्रत्यक्ष पाहिलेल्या अल्पवयीन आरोपीने हा प्रकार त्याच्या नातेवाईकांना सांगितला. त्यामुळे हे बिंग फुटले. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून आज पहाटे तीनच्या सुमारास पोलिसांनी कोहिनूर कॉलनीतील अरबाज वाहेद खान (१९) यास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने कोतवालपुरा येथील साथीदार मोहमद मुस्तफा उर्फ परवेज अब्दुल समद (२०) आणि एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून दगड आणि मयताचे कपडे जप्त केले. मयत शेख माजीद ऊर्फ मुर्गी हा नरभक्षक बबल्याचा साथीदार असून, रिक्षाचालक मजास याच्या खून प्रकरणातील आरोपी होता. नुकताच तो जामीनावर सुटला होता.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबाद