औरंगाबाद : ‘मुप्टा’ शिक्षक संघटनेच्या वतीने १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी दोनदिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खुलताबाद विश्रामगृह येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते होईल. डॉ. अशोक बनसोड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पहिल्या सत्रात प्रा. भास्कर टेकाळे, दुसऱ्या सत्रात डॉ. पंचशील अंबेकर, तर तिसऱ्या सत्रात प्रा. प्रदीप रोडे आणि दुसऱ्या दिवशी डॉ. हर्षवर्धन मार्गदर्शन करतील. समारोप समारंभास आमदार सतीश चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. शिबिरास जास्तीत जास्त संख्येने शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. सुनील मगरे, डॉ. संभाजी वाघमारे, राजेंद्र जाधव, शेख मुनीर, पद्माकर कांबळे, बी.जी. गायकवाड यांनी केले आहे.
मुप्टाचे १३, १४ फेब्रुवारी रोजी चिंतन शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:02 IST