बीड : जिल्ह्यातील सहाही पालिका निवडणुका शिवसंग्राम सक्षमपणे लढणार असून मूलभूत विकासाचे मुद्दे अजेंड्यावर आहेत. भाजपची शिवसंग्रामबद्दलची भूमिका लक्षात घेता जिल्ह्यात स्वबळावर लढण्याची तयारी असून, इतर ठिकाणी युतीची तयारी असल्याचे शिवसंग्रामचे संस्थापक आ. विनायक मेटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के, प्रदेश सरचिटणीस दिलीप गोरे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, सुहास पाटील, अशोक लोढा, डॉ. रमेश पानसंबळ, अनिल घुमरे यांची उपस्थिती होती. आ. मेटे म्हणाले, बीड कृउबा निवडणुकीत महायुती केली होती; परंतु दगाफटका झाला. भाजपचा थेट नामोल्लेख टाळत त्यांनी काहींनी दिवसा आमच्यासेबत व रात्री दुसऱ्यासोबत अशी भूमिका घेतल्याची खरमरीत टीका केली. पालिकेविरुद्धच्या तक्रारीनंतरही कारवाई झाली नाही. सरकारमधील काहींनी क्षीरसागरांना मदत केल्याचा आरोपही त्यांनी केला.नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी २२ ते २५ आॅक्टोबर दरम्यान अर्ज मागविण्यात येत आहेत. २६ रोजी सहाही पालिकांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार असून २७ रोजी उमेदवारांची अंतिम नावे जाहीर करण्यात येतीले. २८ व २९ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. राज्यात ५० ठिकाणी शिवसंग्राम लढणार असल्याचेही मेटे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)त्यांचे भांडण लुटुपुटूचे..!क्षीरसागरांवर टीका करताना आ. मेटे म्हणाले, नगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही भावांनी अर्ज मागविले आहेत. सत्तेसाठी त्यांनी हा पद्धतशीर डाव रचला असून त्यांचे भांडण हे लुटुपुटूचे असल्याचा आरोपही त्यांनी केला. शहरात विकासाचे एक तरी काम पालिकेने धड केले का? असा सवालही त्यांनी केला...तर अराजकीय सहकार्य घेणारक्षीरसागर अनेक वर्षे बीड पालिकेच्या सत्तेला चिकटून आहेत. त्यांच्याकडील सत्ता हिसकावण्यासाठी शिवसंग्राम सक्षम पर्याय आहे. मात्र, शहराच्या विकासाची तळमळ असणाऱ्यांचे अराजकीय सहकार्य घेण्यास आपण तयार असल्याचे आ. मेटे यांनी स्पष्ट केले. दोन पावले पुढे अन् मागे येण्यास तयार असल्याचे सांगून त्यांनी सूचक रणनितीचे संकेत दिले.
पालिका निवडणुका जिल्ह्यात स्वबळावर -मेटे
By admin | Updated: October 22, 2016 00:26 IST